ग्रामीण

शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात साठवण बंधारे, पाझर तलाव दुरुस्तीसाठी ७ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी आमदार मोनिका राजळे


शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव व पाथर्डी तालुक्यात गत1वर्षी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना मोठ्या प्रमाणात आलेल्या पुरामुळे साठवण बंधारे, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, सिमेंट नाला बांध तसेच पाझर तलाव यांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यांची तातडीने दुरुस्ती करणे कामी ७ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देतांना आमदार मोनिका राजळे म्हणाल्या की,मतदारसंघात मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानीबाबत जलसंधारण विभागाला केलेल्या सुचना प्रमाणे प्रादेशिक जलसंधारण विभाग, नाशिक यांनी मतदारसंघातील ८१ दुरुस्ती कामांचा प्रस्ताव शासनास सादर केला होता, याकामी जलसंधारण मंत्री यांच्याकडे सातत्याने कामाचा पाठपुरावा केल्याने, मुख्यमंत्री जलसंधारण योजने अंतर्गत मृद व जलसंधारण विभागांतर्गत मतदारसंघात ७ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये शेवगाव तालुक्यासाठी ५ कोटी २५ लाख, तर पाथर्डी तालुक्यासाठी २ कोटी ५२ लाख रुपयांचे कामांचा समावेश असल्याचे राजळे यांनी सांगितले.दुरुस्तीच्या कामांमध्ये शेवगाव तालुक्यातील वडुले गावातील ६, चेडेचांदगाव येथील ४, तर ठाकुर पिंपळगाव, लाडजळगाव, मडके, भगूर, आखेगाव,अंतरवाली बुद्रुक गावातील प्रत्येकी ३,लखमापुरी, हातगाव, मलकापूर, वरूर, सुकळी, खरडगाव, सुळे पिंपळगाव, मुरमी, लोळेगाव, सुकळी, ढोरजळगाव आदी गावांतील प्रत्येकी २ दुरुस्तीचे कामांचा समावेश आहे. तर पाथर्डी तालुल्यातील येळी, भुतेटाकळी, कोळसांगवी, कोरडगाव, खेर्डे, मालेवाडी, मिडसांगवी, मोहोज, पागोरीपिंपळगाव, प्रभुपिंपरी, शेकटे, अकोला, सुसरे, भालगाव, सोनोशी, सोमठाणे नलवडे, दुलेचांदगाव, चिंचपूरइजदे, मोहटे, तिनखडी, पाथर्डी (वनेश्वर), भवरवाडी, मिडसांगवी, पिंपळगव्हाण, हाकेवाडी, रुपनरवाडी, मुंगसवाडे आदी गावांचा समावेश आहे.      जलसंधारण विभागाचे दिनांक २७ जानेवारी रोजीचे शासन निर्णय क्र. मुजयो -२०२२/प्र.क्र.-२१/जल-१ व मुजयो -२०२२/प्र.क्र.-२४/जल-१ प्रमाणे मतदारसंघातील साठवण बंधारे, कोल्हापूर बंधारे, सिमेंट नाला बांध तसेच पाझर तलाव दुरुस्तीसाठी ७ कोटी ७७ लाख रुपयांचा भरीव निधीस प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे आमदार मोनिका राजळे यांनी आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button