न्हावी समाज बांधवांनी सर्वेक्षणात हिंदू न्हावी अशी नोंद करावी. -दिलीप राऊत

बीड–महाराष्ट्रातील सर्व न्हावी समाज बांधवानी सर्वेक्षणा मध्ये हिंदू न्हावी अशी नोंद करावी.असे आवाहन राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे बीड जिल्हा अध्यक्ष :- दिलीप राऊत यांनी केले आहे
,दि.23 जानेवारी 2024 ते दि.30 जानेवारी 2024 पर्यंत मराठा समाज आरक्षणाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने खुल्या प्रवर्गासह राज्यातील संपूर्ण obc प्रवर्गाचे पण सर्वेक्षण होणार आहे. या सर्वेक्षणात जातप्रमाण पत्रानुसारच आपल्या मुळ जातीचीच नोंद करावी.
तरी सर्व न्हावी समाज बांधवानी ज्यावेळी सर्वेक्षण करण्यासाठी प्रगणक (शासनाचे प्रतिनिधी) आपल्या घरी येतील, त्यावेळी आपण सर्वानी त्याच्याकडे आपल्या जातीची नोंद करताना हिंन्दू न्हावी म्हणूनच करावी कारण या निमित्ताने महाराष्ट्रामधील आपली एकूण न्हावी समाज बांधवाची लोकसंख्या स्पष्ट होईल त्याच बरोबर महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे पण आपली हिंदू न्हावी म्हणून च नोंदणी देखील होईल.
सर्वानी सर्वेक्षण करताना आपल्या जातीची नोंद फक्त हिंदू – न्हावी म्हणूनच करावी असे आवाहन , राष्ट्रीय जनसेवा पक्षा चे बीड जिल्हा अध्यक्ष दिलीप राऊत यांनी केले आहे .