तर देवठाण च्या तलाठी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा !तलाठ्याच्या मनमानी वर ग्रामस्थ संतापले

अकोले प्रतिनिधी
प्रजासत्ताक दिनी ,26 जानेवारी रोजी देवठाण ची ग्रामसभा पार पडली,
ह्यावेळी अनेक विषयवार चर्चा झालीयात देवठाण च्या तलाठी कार्यालयाचा विषय चांगला च रंगला
गेल्या 3 महिन्यापासून देवठाण गावचे तलाठी कार्यालयच उघडत नाही..सातत्याने कार्यालय बंद असते उघडले तरी. फक्त कोतवाल हजर असतो.
तलाठी .. तात्या सरकारी कामकाजापेक्षा जमीन खरेदी विक्री व्यवहारात मध्यस्तीचे कामातच सतत व्यस्त असतात नोकरी पेक्षा
.
ह्यांची जमीन विक,त्यांची खरेदी करून दे अशा प्रकारचे जमीन खरेदी विक्री चे व्यवहार ते करतात,दलाली काम करतात.नोकरी वर लक्ष कमी आणि बाकीच्या गोष्टीत लक्ष जास्त घालतात. फक्त आठवड्यात 2 दिवस तलाठी जेमतेम हजर राहतात.. त्यातही पूर्ण वेळ हजर राहत नाही..

दुपारी तर कार्यालय पूर्णपणे बंद असते.
दुपारीबाहेर जाताना शासन नियम प्रमाणे नोटीस बोर्ड वर लिहून जात नाही..
फोन केला तर लागत फोन पण उचलत नाही…त्यामुळे सामान्य नागरिक ह्यांची प्रंचड गैरसोय होते.. तरी वरिष्ठ अधिकारी,तहसीलदार,प्रांत ह्यांनी तलाठी ह्यांच्यावर रीतसर कार्यवाही करावी अशी मागणी देवठाण ग्रामस्थ यांनी ,तसा ठराव घेण्यात आला..
जर काम काजात सुधारणा झाली नाही.तर तलाठी कार्यालयला लवकरच
टाळे ठोकण्यात येतील… असा इशारा ग्रामस्थ ह्यांनी दिला
ह्यावेळी, तुळशीराम कातोरे,अरुण शेळके,शिवाजी पाटोळे,सुभाष
सहाणे,महेश सोनवणे,तुकाराम पाटोळे,सुधीर शेळके, नाथू पथवे,
सीताबाई पथवे दिनू बोडके,महेश शेळके, सचिन मोहिते सुनील घाडगे,विष्णू शेळके असे अनेक ग्रामस्थ हजर होते