माका येथील ग्रामदैवत दैवत मंकावती देवी मातेचा यात्रा उत्सव सम्पन्न

दत्तात्रय शिंदे
माका प्रतिनिधी
माका येथील ग्रामदैवत तसेच परिसरातील आराध्य दैवत मंकावती देवी मातेचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.
सालाबादप्रमाणे पौष पौर्णिमेला माका ग्रामस्थ व मंकावती माता देवी ट्रस्ट कमिटीच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यात्रा उत्सव काळात माका व परिसरातील तसेच राज्यभरातील हजारो भाविकांनी मंकावती देवी मातेचे दर्शन घेतले. कुस्त्यांच्या जंगी हगाम्याने या यात्रा उत्सवाची सांगता झाली.
माका गावाचे नाव देवी मंकावतीच्या नावावरुनच पडले असुन,
प्रभुरामचंद्रांनी याच ठिकाणी राक्षस अहिराव व महिरावाचा वध केल्याची आख्यायिका आहे. यामुळे या देवीच्या यात्रा उत्सवाची परंपरा फार जुनी आहे. यात्रा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात्रा उत्सवात परिश्रम घेणाऱ्या तरुणांचे व ग्रामस्थांचे जगदंब देवी ट्रस्टच्या वतीनेस
ॲड. गोकुळ भताने यांनी स्वागत केले. यात्रा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी यात्रा कमिटीचे किसन भानगुडे, रामदास घुले, लक्ष्मण पांढरे, खंडू लोंढे, संभाजी लोंढे, भानुदास म्हस्के, देविदास भुजबळ, सुभाष गाडे, बाबासाहेब लोंढे, सुदाम घुले, अंबादास लोंढे, बबन भानगुडे, आदिनाथ म्हस्के, संदीप मदने, गणेश हंडाळ, संतोष भानगुडे, जाकीर
पठाण, सचिन देवकाते, राहुल लोंढे, सतीश लोंढे, सचिन सोन्नर, डॉ. यशवंत होंडे, गहिनीनाथ लोंढे, कामराज भानगुडे, बाबा जंगले, नरेंद्र बोंद्रे, कामराज पालवे, स्वरुपचंद गायकवाड यांनी परिश्रम घेतले.