लांडेवाडी येथे ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे किर्तन

सोनई–प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील लांडेवाडी रोडलगत असलेले दरंदले वस्तीवर सलाबादप्रमाणे बुधवार दि.२ फेब्रुवारी २२ रोजी धर्मनाथ बीज उत्सव सोहळ्याचे निमित्ताने सकाळी १० वा.समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आल्याची माहिती लक्ष्मण शामराव दरंदले,डॉ. हरिभाऊ दरंदले,डॉ. माणिक दरंदले,व डॉ. बाळासाहेब दरंदले यांनी दिली.
या निमित्ताने संतपूजन देवगडचे गु.ह.भ.प.भास्कर गिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, या निमित्ताने दैनंदिन कार्यक्रमात ह.भ.प.सुनीलगिरीजी महाराज,ह.भ.प.पंढरीनाथ महाराज तांदळे, ह.भ.प.अतुल महाराज आदमाने,बेल्हेकरवाडी रेणुकामाता संस्थानचे ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज,ह.भ.प.साध्वी तुलसीदीदी, यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न होणार आहे, तेव्हा महाप्रसादाचा वाटपाचा कार्यक्रम होईल,तरी नागरिकांनी या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे अवाहन डॉ. ज्ञानेश्वर रामराव दरंदले यांनी केले आहे.