भारतीय मजदूर संघाचे जेष्ठ कार्यकर्ते अप्पा कुलकर्णी यांचे दु:खद निधन

पुणे-भारतीय मजदूर संघ संलग्नीत वीज ऊद्योगातील महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे जेष्ठ कार्यकर्ते , पुर्व पदाधिकारी श्री विलास विण्णु कुलकर्णी ऊर्फ अप्पा कुलकर्णी यांचे दि 27 डिसेंबर 2023 रोजी वृध्दापकाळाने दु:खद निधन झाले.
मृत्यू समयी त्यांचे वय 78 होते. महावितरण कंपनी च्या पुणे सर्कल मधील कामगार महासंघाचे कार्य विपरीत परिस्थिती असताना तळागाळापर्यंत पोहचवण्याचे कार्य कै अप्पा कुलकर्णी यांनी केले होते. पुणे जिल्हा, नगर जिल्हातील संगमनेर, कोपरगाव, रहाता, श्रीरामपुर, नेवासा या तालुक्यात सतत कार्यरत राहुन, प्रवास करून भारतीय मजदूर संघाचे काम उभे केले आहे.
कै अप्पा कुलकर्णी नाट्य, संगीत, नाट्य निर्माते म्हणून अग्रेसर होते, वीज महामंडळात नाट्य स्पर्धा सुरू झाल्यावर त्यांनी दिग्दर्शन नेपत्ध या क्षेत्रात महत्वपूर्ण भूमिका बजावली, अनेक नाटके आयोजित केली होती . नाट्य, चित्रपट क्षेत्रातील दिग्गज कलाकारांशी त्यांचा व्यक्तीगत परिचय होता. महाराष्ट्र शासनाच्या नाट्य परिषदेचे च्या सदस्य म्हणून काम केलं होते.