वीज पुरवठा खंडित केल्याच्या निषेधार्थ कोतुळ येथे बंद

कोतुळ प्रतिनिधी
वीज थकबाकी वसुली साठी शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे निषेधार्थ अकोले तालुक्यातील कोतुळ येथे आज शनिवारी बंद पाळून निषेध करण्यात आला
शेतकर्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता ट्रांसफार्मर वरील वीज पुरवठा बंद करून शेतकऱ्यांचा वीज पुरवठा वीज वितरण तोडला आहे याचा निषेध करण्यासाठी कोतुळ येथे आज शनिवारी भाजप व शेतकऱ्यांनी बंदचे आवाहन केले होते या ला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत बंद पाळला यावेळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर निषेध सभा घेण्यात आली या सभेत अनेकांनी वीज वितरणाच्या कारभारावर टीका केली
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सीताराम देशमुख,, युवा नेते राजेंद्र पाटील देशमुख भाजपाचे सोमदास पवार, गणेश पोखरकर, संजय लोखंडे, मनोज देशमुख ,भाऊसाहेब देशमुख ,शाम देशमुख, आदींनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले
राजेंद्र पाटील देशमुख यांनी तालुकतातील वीज वितरणाच्या कामकाजावर आमदार लहामटे यांचा वचक नसल्याचा आरोप केला यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले तर सीताराम पाटील देशमुख यांनी वीज वितरण चा जुलमी कारभार तालुक्यात सूर असून वीज वितरण च्या अधिकाऱ्यांची मनमानी सुरू असल्याचे सीताराम देशमुख यांनी यावेळी सांगितले

याप्रसंगी सरपंच भास्कर लोहकरे, उपसरपंच संजय देशमुख अगस्ती कारखान्याचे माजी संचालक सयाजीराव देशमुख, भरत देशमाने ,बाळासाहेब देशमुख ,शंकर घोलप , गोपीनाथ देशमुख सयाजी देशमुख ,भीमराज देशमुख, निवृत्ती लोखंडे तसेच शेतकरी उपस्थित होते बाजार पेठेत बंद पाळून वीज वितरण च्या कारभाराचा निषेध नोंदवला दुपार नंतर व्यवहार सुरळीत झाले