इतर

सुपरहिट कन्नड चित्रपट ‘न्याय रक्षक’ येतोय अल्ट्रा झकास ओटीटीवर!

मुंबईआईकडून मुलांना मिळणारं ज्ञान आणि संस्कार आयुष्याच्या जडणघडणीत पुरून उरत असतात. अशाच आई आणि मुलाची समाजाप्रती एक संघर्षमय कथा ‘न्याय रक्षक’ या कन्नड चित्रपटात दडून आहे. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर चित्रपटाच्या मराठी रूपांतराचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार असून प्रेक्षकांना आई आणि मुलाच्या विलक्षण नात्याची अनुभूती येणार आहे.

सत्यासाठी जीव देणाऱ्या सत्यवादी आईचा सत्यवादी मुलगा समाजाचा प्रतिनिधी होऊन समाजासाठी लढतो आहे. हा लढा समाजाचं शोषण करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांच्या विरोधात आहे. प्रस्थापित राजकीय पुढाऱ्यांच्या होणाऱ्या शोषणापासून अखंड समाजाला वाचवू शकेल का चित्रपटाचा नायक? या प्रश्नाचं उत्तर हे चित्रपटात मिळणार आहे.

“प्रत्येक आठवड्याला नव्या चित्रपटांच्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांचं मनभरून मनोरंजन करत आहोत. या आठवड्यात सुपरहिट कन्नड चित्रपट ‘न्याय रक्षक’ मराठी भाषेत मराठी प्रेक्षकांसाठी सादर करताना अत्यंत आनंद होत आहे. रसिकांना चित्रपट नक्कीच आवडेल अशी मनापासून आशा आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.इ.ओ. श्री.सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.
नवनवीन चित्रपट पाहण्यासाठी :- https://www.ultrajhakaas.com/marathi-movieshttps://www.ultrajhakaas.com/marathi-movies

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button