दहिगाव-ने येथील नवजीवन विद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप !

आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा- सुनिल शिंदे
शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत ध्येय निश्चित करून जिद्द,चिकाटी व कठोर परिश्रम या मार्गाचा अवलंब करून आपले ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.नेहमी सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी.आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे.
या स्पर्धेमध्ये जर आपल्याला टिकायचे असेल तर अभ्यासाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही.आपल्या आई-वडिलांनी आपल्याकडून जी स्वप्न बघितली ती स्वप्न पूर्ण करण्याचा नेहमी प्रामाणिकपणे प्रयत्न करावा.अपयश ही यशाची पहिली पायरी आहे त्यामुळे जीवनात कधीही अपयश आले तर खचून न जाता नव्या उमेदीने पुन्हा तयारीला लागावे.स्वतःवर जर विश्वास असेल तर जगामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने येणाऱ्या परीक्षेला सामोरे जावे असे प्रतिपादन शेवगाव तालुक्यातील दहिगाव-ने येथे नवजीवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित इयत्ता बारावीच्या निरोप समारंभात विद्यालयाचे प्राचार्य सुनिल शिंदे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले.
यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य आप्पासाहेब म्हस्के,मधुकर घाडगे, काकासाहेब घुले,डॉ.रमेश खैरे,बाळासाहेब मंडलिक,मकरंद बारगुजे आदि उपस्थित होते.यावेळी काही विद्यार्थी व प्राध्यापकांनी प्रतिनिधिक स्वरूपात आपली मनोगते व्यक्त केली.परीक्षा केंद्रप्रमुख डॉ.रमेश खैरे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचना दिल्या.
या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रा.विजय घुले,रोहित मोटकर,डॉ.ज्ञानेश्वर गायके,अशोक नीळ,दत्तात्रय सुडके,डॉ.महेश शेजुळ,शौकत पठाण,डॉ.राजेंद्र नाबदे,प्रवीण पवार,बप्पासाहेब विघ्ने,दिपक शेलार,संदीप नलावडे,योगेश वारुळे,आप्पासाहेब खंडागळे, मल्हारी फाटक, भाऊसाहेब गवळी, संतराम आगे,सुनिता ढगे,अनिता नेव्हल,आरती देशमुख आदि प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका मरकड व मायशा शेख यांनी केले तर उपस्थितांचे आभार कु. प्रज्ञा चव्हाण हिने मानले.