आजचे पंचांग व राशिभविष्य दि.२४/०२/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन ०५ शके १९४५
दिनांक :- २४/०२/२०२४,
वार :- मंदवासरे(शनिवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:५३,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:३२,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- उत्तरायण
ऋतु :- शिशिरऋतु
मास :- माघ
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- पौर्णिमा समाप्ति १८:००,
नक्षत्र :- मघा समाप्ति २२:२१,
योग :- अतिगंड समाप्ति १३:३४,
करण :- बालव समाप्ति –:–,
चंद्र राशि :- सिंह,
रविराशि – नक्षत्र :- कुंभ – शततारा,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- मकर,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी ०९:४८ ते ११:१५ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०८:२० ते ०९:४८ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०२:१० ते ०३:३७ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०३:३७ ते ०५:०५ पर्यंत,
❀ दिन विशेष:
माघस्नान समाप्ति, अन्वाधान,
————–
: 🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन ०५ शके १९४५
दिनांक = २४/०२/२०२४
वार = मंदवासरे(शनिवार)
मेष
क्षणिक सौख्याचा आनंद मिळवाल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल. लहानात लहान होऊन रमून जाल. काही कामे दिरंगाईने होतील. औद्योगिक बदल समजून घ्यावेत.
वृषभ
आपल्याच मतावर आग्रही राहाल. आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्याल. जोडीदाराचा वरचष्मा राहील. वादाचे कारण उकरून काढू नका. तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल.
मिथुन
पोटदुखीसारखे त्रास संभवतात. एका वेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. जोडीदाराशी असणारे मतभेद वाढवू नका. एकमेकांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करावा. वेळेचे योग्य नियोजन कराल.
कर्क
जोडीदाराच्या प्रगतीत हातभार लावावा. पचनाच्या विकारांकडे दुर्लक्ष करू नका. व्यायामाचा कंटाळा करू नये. मनातील इच्छा पूर्ण होईल. व्यापारी वर्गाला फायदा संभवतो.
सिंह
कामाचा उरक वाढेल. कौटुंबिक समस्या भेडसावतील. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. तुमच्या मान-सन्मानात भर पडेल. मुलांची प्रगती सुखकर राहील.
कन्या
अती अपेक्षा ठेवू नये. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात ठेवून वागा. परोपकाराची जाणीव ठेवावी. हाता-पायाची दुखणी संभवतात.
तूळ
अनामिक चिंता लागून राहील. समतोल राखण्याचा प्रयत्न करावा. प्रवासात सतर्क राहावे. खर्च वाढू शकतो. नातेवाईकांना मदत कराल.
वृश्चिक
पित्तविकाराचा त्रास जाणवेल. कामाचा ताण जाणवेल. किरकोळ इजा होण्याची शक्यता आहे. मनातील निराशा बाजूला सारावी. बाहेरील पदार्थ खाणे टाळावे.
धनू
डोळ्याची काळजी घ्यावी. काही खर्च आवाक्याबाहेरील वाटू शकतात. नसत्या भानगडीत लक्ष घालू नका. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कौटुंबिक चिंता सतावेल.
मकर
अति श्रमामुळे थकवा जाणवेल. कामात दिरंगाई होऊ शकते. चिकाटी ठेवावी लागेल. मनात उगाच नसत्या शंका आणू नका. कौटुंबिक सौख्याकडे लक्ष द्यावे.
कुंभ
मानसिक चंचलता जाणवेल. अभ्यासूवृत्ती ठेवून वागाल. कामात तत्परता दाखवावी. सर्व गोष्टींकडे बारीक लक्ष ठेवाल. हसत-हसत कामे कराल.
मीन
कागदपत्रांची योग्य छानणी करावी. फसवणुकीपासून सावध राहावे. ओळखीतून कामे करण्याचा प्रयत्न करावा. सर्वांशी मिळून-मिसळून वागाल. जवळचा प्रवास मजेत होईल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर