महाशिवरात्री निमित्ताने फॅशन डिझाईनिंग व श्री शिव सहस्त्रनाम स्तोत्रम् पठण!

पद्मशाली सखी संघमचा उपक्रम..!
सोलापूर – ‘जागतिक महिला दिनाचे’ औचित्य साधून महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी मिळावीत, म्हणून फक्त महिलांसाठी फॅशन डिझाईनिंग, हेअर स्टाईल आणि महाशिवरात्री रोजी श्री शिव सहस्त्रनाम स्तोत्रम् आयोजित केल्याची माहिती श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित, पद्मशाली सखी संघमच्या अध्यक्षा सौ. ममता मुदगुंडी आणि सचिवा ॲड. सौ. रेखा गोटीपामूल यांनी दिल्या आहेत.
शुक्रवारी ‘श्री शिव सहस्त्रनाम स्तोत्रम्’
शुक्रवार दि. ८ मार्च रोजी महाशिवरात्री निमित्ताने ‘श्री शिव सहस्त्रनाम स्तोत्रम् ‘ पठणाचा कार्यक्रम सौ. लक्ष्मी कोडम यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी १० वाजता पूर्व भागातील श्रीराम मंदिर येथे सुरवात होईल. यावेळी महिलांना पुस्तक व भगवान श्री शंकराला प्रिय असलेल्या ‘बेलपत्री’ श्रीराम मंदिरातील महादेवाला अर्पण करण्यासाठी देण्यात येणार आहे.
‘रविवारी ऑनलाईन फॅशन डिजाईनिंग’
रविवार १० मार्च रोजी दुपारी ४ वाजता पुणे येथील ‘लिबर्टी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’चे सर्वेसर्वा दिलीप कारमपुरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली ब्लाऊज, पंजाबी ड्रेस, फ्रॉकचे विविध फॅशन्स कशा तयार करायचे? त्यातील बारकावे बघण्याची, शिकण्याचे आणि इतर माहिती ते स्वतः देणार आहेत. इच्छुकांनी ‘झूम ॲप’ नसेल तर डाउनलोड करुन रद्दीच्या पेपर, कात्री सोबत ॲपवर सहभागी व्हावेत. फॅशन डिजाईनिंग हे विनामूल्य असून 9175988940 याभ्रमणध्वनीवर संपर्क साधावेत. व्हाटस्अप ग्रुप तयार करुन ‘लिंक’ पाठवले जाईल.
‘सोमवारी हेअर स्टाईल’
सोमवार, ११ मार्च रोजी दुपारी ४ . ३० वाजता ‘संगमनेर’ येथील ‘प्रिया मेकअप स्टुडिओ’चे सौ. प्रियांका अक्षय दासरी यांच्या सहकार्याने महिलांसाठी विविध प्रकाराच्या हेअर स्टाईल (केश रचना) ऑनलाईन पध्दतीने शिकवले जातील. हे सर्व उपक्रम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा यांच्या पुढाकारातून होत असून इच्छुक असणा-यांनी गुगल ॲप डाउनलोड करुन 9175988940 या भ्रमणध्वनीवर नांवे नोंदवून अधिक माहितीसाठी त्यावरच संपर्क साधावेत, असे आवाहन पद्मशाली सखी संघमच्या उपाध्यक्षा सौ. जमुना इंदापूरे, सहसचिवा सौ. ममता तलकोकूल, खजिनदार सौ. दर्शना सोमा, सहखजिनदार सौ. लक्ष्मी कोडम, कार्याध्यक्षा सौ. वरलक्ष्मी गोटीपामूल, समन्वयिका सौ. अरिता इप्पलपल्ली, सौ. सुनिता क्यामा, सौ. कला चन्नापट्टण, सौ. अंबुबाई पोतू, यांच्यासह सदस्या सौ. रजनी दुस्सा, सौ. भाग्यश्री पुंजाल, सौ. लता मुदगुंडी, सौ. पल्लवी संगा आणि इतरांनी केल्या आहेत. वरील कार्यक्रम वेळेवर सुरु होतील, याची नोंद घ्यावी.
—————————-
