इतर
स्त्री शक्तीचा जागर
आंतरराष्ट्रीय महिला दिन
हिंदवी स्वराज्याचे स्वप्न ज्यांनी साकार केले त्या मासाहेब जिजाऊ , शिक्षणाची गंगोत्री सर्वसामान्यांच्या घरोघरी पोहोचवली अशा माय सावित्री, फातिमाबी शेख ,रमाबाई ,श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी ज्यांनी लिहिली ते साने गुरुजी की त्यांच्या बालमनावर विविध संस्कारातून त्यांच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला त्यातूनच त्यांचा जीवनविकास घडविणाऱ्या त्यांच्या आई यशोदाबाई अशा अनेक स्त्रियांना अनन्यसाधारण महत्व आहे . त्यांच्या कार्याचा इतिहास सुवर्णअक्षरांनी पानांवर लिहिला गेला.त्यामधे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी रणांगणावर पाठीवर बाळ असताना शत्रूशी झुंज दिली .सामाजिक ,शैक्षणिक,साहित्यिक ,सांस्कृतिक ,क्रीडा ,अवकाश अशी सर्व क्षेत्रे महिलांनी गाजविली काबीज केली. बहिणाबाई , इंदिरा गांधी,सुषमा स्वराज,प्रतिभाताई पाटील,कल्पना चावला आजही आपल्या स्मरणात आहे.
अकोले,अहमदनगर
महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो न्यूयॉर्क येथे 28 फेब्रुवारी 1909 रोजी पहिला दिन साजरा करण्यात आला . सन 1910 च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन निश्चित करण्यात आला आणि त्यानंतर दरवर्षी हा दिवस अनेक ठिकाणी साजरा केला जातो .यानिमित्त अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यांचा कामाचा,कार्याचा ,कृतज्ञतेचा दिवस म्हणून सन्मान केला जातो . स्त्री अनेक भूमिका आपल्या रोजच्या जीवनात निभावत असते आई, बहीण,मामी,मावशी, आजी आत्या,वहिनी ,पत्नी अशा भूमिका निभावत असताना तिची मात्र तारेवरची कसरत असते . प्रत्येक स्वरूपात पाठिंबा देत असते.घरदार ,संसार, मुळबालं ,नातीगोती ,नोकरी हे सर्व पेलावत असताना स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असते. पहाटेपासून तिचा दिवस होत असतो सुरू झाडलोट, नाष्टा,जेवण धूणभांडी,साफसफाई, पाहुणेरावळे, मुलबाळ ,नातीगोती, सण समारंभ या सर्वांचे गणित जुळवत असते. सर्वांना असते आठवड्यातून एक दिवस सुट्टी मात्र आईला मिळते का कधी एक दिवस आपल्या स्वतःसाठी सुट्टी .. तिचे आपले रोजचेच वेळापत्रक आणि कामे. उलट सुट्टीच्या दिवशी जास्तीचा होमवर्क तिला करावा लागतो तरी देखील मोठ्या जोमाने आपल्या कुटुंबासाठी करत असते .. सर्वांसाठी जगताना स्वतः जगणच मात्र विसरून जातो.देवाने एक सहनशिल मूर्ती म्हणून तिला प्रेरित केलेले.प्रत्येक क्षेत्रे तिने काबीज केली ..तरी देखील बातम्या ऐकताना,वाचताना,पाहताना तिच्यावर होणारा अन्याय ,अत्याचार थांबलेला नाही . जशी दृष्टी असेल तशीच सृष्टी दिसेल या वाक्याप्रमाणे अनेक ठिकाणी तिच्यावर अत्याचार होताना पाहिल्यावर मन हेलावून जाते.त्यासाठी तर समाजात वावरताना आपली आई,बहीण समजून त्या नजरेने आपण भक्षक नसून प्रसंगी रक्षक बनावे. आपल्या घरात कोणी वाकडी नजर टाकली तर पचनी पडत नाही तर इतरांवर असे दुष्कृत्य करताना काळीज कसे घडधड करत नाही म्हणून महिलांनी,मुलींनी स्वयंसंरक्षणाचे धडे घ्यावेत भाग्यविधाते आपणच होवूनी समाजात एक उदाहरण म्हणुनी रहावे.
स्त्री शक्तीची अनेक रूपे पाहण्यास मिळतात हिरकणी आपल्या बाळासाठी दूध आणण्यासाठी गडाचे दरवाजे बंद झाले सायंकाळी तेव्हा ती आपल्या जीवाची परवा न करता बुरुजावरुन खाली उतरली प्रसंगी अंग रक्तबंबाळ झाले तरी न डगमगता खाली उतरली .मायेचा जिवंत झरा ओसंडून वाहणारा सहनशिलतेची दिव्य शक्ती ऐकण्यास मिळाली किती तो त्याग आणि समर्पण ..चूल आणि मूल पलीकडे स्त्रियांना बाहेर निघण्याचा हक्क माय सावित्रीने त्यांना बरोबरीने साथ देणाऱ्या फातिमाबी शेख यांनी प्रसंगी दगडगोट्याचा मारा झेलून शिक्षणाची कवाडे खुली केली म्हणून आज आपण सर्व महिला सन्मानाने जगत आहोत ,शिकत आहोत ती क्रांती ज्योतीरावांच्या सहचारिणी बनून माय सावित्रीने इतिहास घडविला. कधी भावाची पाठरखिण, सुखदुःखात कठीण प्रसंगी ढाल बनून पतीला साथ देणारी. मैदानावर तलवार पेलणारी, कधी श्रीरामाची सीता होणारी , नातवाची आजी, दुर्गा, काली , पुरंध्री , चंडिका ,जगदंबा सांगावी तेव्हढी महती कमीच आहे... परंतु महिला भगिंनाना सांगावेसे वाटते संविधानाने महिलांना अधिक अधिकार बहाल केली त्याची पायमल्ली होणार नाही आणि यामुळे पुरुषांवर देखील अन्याय होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे .हे लिहावेसे वाटण्याचे कारण हल्ली पुरुषांवर देखील महिला कायद्याच्या जोरावर त्रास देण्याचं काम करतात परंतु दाद मागणार कुठे कारण त्यासाठी वेगळे न्यायालय नाही आणि महिलांच्या बाजूने कायदे असल्याने तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी अवस्था ऐकण्यास मिळत आहे .अशा घटना सध्या सोशल मीडियामुळे जास्त जोर धरत आहे . सर्वच ठिकाणी असे होते असे नाही तर हल्ली प्रमाण वाढले आहे..हे सांगण्यास आता पुरुष मंडळी धजावत आहे. विचाराधीन विषय आहे हा आजच्या काळात ....
सबला आहे नारी जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी . स्त्री आता अबला राहिली नसून तर ती तलवारीची धार आहे.एक धगधगता अंगार आहे.जबाबदारीची तिला जाण आहे.अवकाशात भरारी घेण्याचे बळ तिच्या पंखात आहे.मार्गात येत असतील अनेक काटे अर्थात संकटे फुलांचा सडा पाडण्याची जिद्द ती बाळगून आहे .मुलांच्या भविष्याला आकार देणारी मायमाऊली सावली आहे.प्रकृतीचे दुसरे नावही नारी आहे . म्हणून तर अनेक ठिकाणी हा दिवस मोठ्या आनंदाने साजरा केला जातो.सन्मान केला जातो .महत्त्वाचे नजरेत रोजच सन्मान असणे महत्त्वाचे आहे.
आपण नेहमीच व्यासपीठावर कर्तृत्ववान महिलांच्या हस्ते महिलांचा सन्मान करत असतो.परंतु आज उन्हातान्हात शेतात राबणाऱ्या कष्टकरी,कामकरी महिला ,साफसफाई करणाऱ्या भगिनी कुडाकचरा वेचणाऱ्या महिला , धुणभांडी करणाऱ्या महिला यांचा हस्ते किंवा यांचा आपण सन्मान करतो का शेवटी त्या पण माणूस म्हणूनच जगतात त्यांना पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा दिसतो . एखादा स्नॅप त्यांच्याबरोबर कोणी आवडीने काढलेला दिसत नाही ...खर तर पोटापाण्यासाठी करणाऱ्या या कष्टाला तोडच नाही .माझ्याकडे विजय बुरके नावाची महिला काम करते तिला मी बुलेट ट्रेन आली म्हणून बोलावते पहाटे चार वाजेपासून घराचे आवरून सकाळी साडे सात पावणे आठपर्यंत कामावर पोहोचते तर मावळतीचा सूर्य देखील दमून मावळतो .तरीही तिच्या हाताला ,पायाला दम नाहीच .कारण तिला आपल्या मनातील घराचे स्वप्न पूर्णत्वास न्यायचे आहे लेकराचं शिक्षण आणि जागा घेवून बांधलेला बारा ते तेरा लाखाचा बंगला मेहनत आणि चिकाटीने पुर्ण केला या गोष्टीचा अभिमान वाटतो.यावर एक प्रकाशझोत म्हणून सांगावेसे वाटले..स्वच्छ्ता कामगार ज्यामुळे गाव,गल्ली रस्ता गटारी नीटनेटक्या दिसतात.शेतात राबणारी एखादी सामान्य महिला यांना वर्षातून एकदा तरी व्यासपीठावर बोलवावे त्यांचा सन्मान करावा.कारण घर सांभाळणे देखील नोकरीपेक्षा सोपे नसते. घराला घरपण देणारी ती महिलाच असते .आता हे सर्वांच्या पचनी पडेल असे नाही... मोट्यांच कौतुक करायला समाज असतोच बसलेला .शेवटी फक्त सांगावेसे वाटते आईवडिलांनी आपल्या मुलामुलींना आपल्या संस्कारातून मोठ्यांचा आदर सन्मान नातीगोती ,मूल्यसंवर्धन शिकवावे .महिलांनी महिलांवर होणारे अन्याय,अत्याचार थांबवावे . सॉसभी कभी बहू थी ऑर बहूभी कभी सॉस होंगी .सासर माहेर यांना जोडणारा दुआ म्हणजे मुलगी ..सासूने सुनेला मुलगी आणि मुलीने सासूला आई समजले तर घरातील पुरुष मंडळींची होणारी कुचंबणा थांबेल. सँडविच होणार नाही.अशा विचारांची पेरणी व्हावी . स्त्रिया म्हणजे देशाची अर्धिशक्ती की देशाच्या प्रगतीत तिचा हातभार आहे. ...महिलादिनाच्या शुभेच्छा भगिनींनो .....चुकल्यास क्षमस्व...
दिलशाद यासीन सय्यद
9850923961