मिशन आरंभ शिष्यवृत्ती परीक्षेचा काळेगाव शाळाचा 100% निकाल

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव – नेवासा राजमार्गावरील काळेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.तर तीन विद्यार्थीनी तालुकास्तरीय गुणवत्ता यादीत आपले नाव कोरले आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या संकल्पनेतून व शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२३ /२४ मध्ये मिशन आरंभ शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी पुढील वर्षाच्या शिष्यवृत्तीच्या पूर्व तयारीसाठी घेण्यात आली. यासाठी वर्षभर शिष्यवृत्ती तासाचे नियोजन करण्यात आले व सराव परीक्षा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांची केंद्र निहाय परीक्षा घेण्यात आल्या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका संगणकाद्वारे तपासण्यात आल्या. शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळेगाव (भायगाव) शाळेतील शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेचा शंभर टक्के निकाल लावला तर तालुका गुणवत्ता यादीत तीन विद्यार्थ्यांनी स्थान पटकावले. त्यामध्ये पृथ्वीराज प्रसाद सौदागर,श्रावणी तुकाराम शेकडे, उन्नती सुरज सौदागर यांचा समावेश आहे. या परीक्षेसाठी चैतन्य कडुबाळ शेकडे,भक्ती तुकाराम लांडे, आदिती प्रवीण लांडे, आर्यन श्रीराम आढाव, सार्थक शेषनारायण पालवे, अर्पिता परसराम आढाव, समर्थ अशोक लांडे या विद्यार्थी -विद्यार्थिनींनी भाग घेतला होता.या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक संदीप आहेर व शाळेचे सहशिक्षक लक्ष्मण पिंगळे यांचे ग्रामस्थ व पालकाकडून कौतुक होत आहे.लवकरच शाळेतील एका विशेष कार्यक्रमात या विद्यार्थ्यांचा गौरव केला जाईल असेही शाळेच्या वतीने सांगण्यात आले