आजचे पंचांग व राशिभविष्य दि.०७/०४/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र १८ शके १९४५
दिनांक :- ०७/०४/२०२४,
वार :- भानुवासरे(रविवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२०,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:४३,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- उत्तरायण
ऋतु :- शिशिरऋतु
मास :- फाल्गुन
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- त्रयोदशी समाप्ति ०६:५४, चतुर्दशी २७:२२,
नक्षत्र :- पूर्वाभाद्रपदा समाप्ति १२:५८,
योग :- ब्रह्मा समाप्ति २२:१७,
करण :- विष्टि समाप्ति १७:०८,
चंद्र राशि :- कुंभ,(०७:३९नं. मीन),
रविराशि – नक्षत्र :- मीन – रेवती,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- मीन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- क्षयतिथि वर्ज्य दिवस,
✿राहूकाळ:- संध्या. ०५:१० ते ०६:४३ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:२५ ते १०:५८ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी १०:५८ ते १२:३१ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०२:०४ ते ०३:३७ पर्यंत,
❀ दिन विशेष:
शिवरात्रि, भद्रा ०६:५४ नं. १७:०८ प.,
————–
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र १८ शके १९४५
दिनांक = ०७/०४/२०२४
वार = भानुवासरे(रविवार)
मेष
सामाजिक सन्मान वाढेल. आशावादी दृष्टीकोन ठेवावा. खाण्यापिण्याची चंगळ राहील. महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवावीत. व्यावसायिक नियम काटेकोरपणे पाळावेत.
वृषभ
धार्मिक गोष्टींत मन रमवा. वरिष्ठांना नाराज करू नका. लहानांच्या आनंदात सहभागी व्हाल. आनंदी दृष्टिकोनाने वागाल. अभ्यासूपणे नवीन गोष्टींत रस घ्याल.
मिथुन
काही गोष्टी इच्छेविरूद्ध कराव्या लागतील घरात मोठ्या लोकांची ऊठबस राहील. वडीलधार्यांचे मत विचारात घ्यावे. पत्नीचे उत्तम सहकार्य लाभेल. मनातील चुकीच्या गोष्टी काढून टाका.
कर्क
मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल. इतरांना तुमच्या भेटीने आनंद वाटेल. उत्तम आर्थिक प्राप्ती येईल. चांगले वाहन सौख्य लाभेल. स्त्रियांच्या मदतीचा लाभ होईल.
सिंह
व्यावसायिक ठिकाणी अनुकूलता राहील. सहकार्यांच्या कौतुकास पात्र व्हाल. व्यापार्यांना चांगला लाभ होईल. तिखट व तामसी पदार्थ खाण्याचे टाळा. चैनीच्या वस्तु खरेदी कराल.
कन्या
मैदानी खेळ खेळाल. शैक्षणिक कामाला गती येईल. नवीन अनुभव मिळतील. जोडीदाराशी मतभेद संभवतात. रागाला आवर घाला.
तूळ
अचानक धनलाभ संभवतो. जोडीदाराचे कौतुक कराल. भागीदारीत नवीन धोरण अजमावाल. घरगुती कामात वेळ जाईल. अती घाई उपयोगाची नाही.
वृश्चिक
स्त्री सौख्यात अधिक रमाल. जवळचा प्रवास कराल. एकमेकांना समजून घ्यावे. प्रकृतीत सुधारणा दिसून येईल. मुलांचा खोडकरपणा वाढेल.
धनू
हाताखालील लोकांकडून कामे करून घेता येतील. कौटुंबिक प्रश्न आधी सोडवाल. जवळचे मित्रमंडळी गोळा कराल. जोडीदाराशी क्षुल्लक कारणांवरून मतभेद वाढवू नका. व्यसनांच्या आहारी जाऊ नका.
मकर
काहीसे हेकेखोरपणे वागाल. सरकारी कामात यश येईल. रखडलेल्या कामाला गती येईल. उगाच चीड-चीड करू नका. संयमी धोरण ठेवावे.
कुंभ
कामाच्या ठिकाणी तुमचा वरचष्मा राहील. अधिकाराने कामे हातावेगळी कराल. घरगुती वस्तूंची खरेदी करता येईल. मनमोकळ्या गप्पा माराल. नवीन मित्र जोडावेत.
मीन
नातलगांशी सलोखा वाढेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. प्रवासाची हौस पूर्ण कराल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. तुमची आवड-निवड दर्शवाल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर