राशिभविष्य

आजचे पंचांग व राशिभविष्य दि.१०/०४/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र २१ शके १९४६
दिनांक :- १०/०४/२०२४,
वार :- सौम्यवासरे(बुधवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१७,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:४४,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- उत्तरायण
ऋतु :- वसंतऋतु
मास :- चैत्र
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- व्दितीया समाप्ति १७:३३,
नक्षत्र :- भरणी समाप्ति २७:०६,
योग :- विष्कंभ समाप्ति १०:३७,
करण :- बालव समाप्ति ०६:५९, तैतिल २८:१४,
चंद्र राशि :- मेष,
रविराशि – नक्षत्र :- मीन – रेवती,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- मीन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी १२:३० ते ०२:०४ पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०६:१७ ते ०७:५१ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०७:५१ ते ०९:२४ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी १०:५७ ते १२:३० पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०५:१० ते ०६:४४ पर्यंत,

❀ दिन विशेष:
शंकर पार्वतीस दवणा वाहणे, दग्ध १७:३३ नं., चंद्रदर्शन (२०:४७ प.,) मु. १५ महर्घ बालचंद्रमाव्रत,,
————–


🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र २१ शके १९४६
दिनांक = १०/०४/२०२४
वार = सौम्यवासरे(बुधवार

मेष
मानसिक चंचलता दूर सारावी. नवीन विचारांना चालना द्यावी. चमचमीत पदार्थ खाल. वेळेचे योग्य नियोजन करावे. आध्यात्मिक गोष्टींकडे कल राहील.

वृषभ
कामाच्या ठिकाणी अनुकूलता राहील. व्यापार्‍यांना चांगला लाभ होईल. मनासारख्या घटना घडून येतील. मैत्रीतील घनिष्ट ता वाढेल. प्रेम सौख्यात भर पडेल.

मिथुन
व्यावसायिक धोरण लक्षात घ्यावे. नवीन आव्हाने स्वीकाराल. बिनधास्त पाने वागू नका. नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. तरुण वर्गाशी संपर्क वाढेल.

कर्क
सार्वजनिक कामात मदत कराल. सरकारी नोकरदारांना प्रगती करता येईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. घरासाठी मोठ्या वस्तु खरेदी कराल. यशाला गवसणी घालता येईल.

सिंह
प्रेमीकांनी अती वाहवत जाऊ नये. हाताखालच्या लोकांना चलाखीपणे सांभाळा. हितशत्रूंकडे बारीक लक्ष ठेवावे. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. दान धर्माचे पुण्य पदरात पडून घ्यावेत.

कन्या
आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नाका. जोडीदाराला आपले मत स्पष्ट पाने सांगा. मनातील संभ्रम दूर करावेत. इतरांना सहृदयतेने मदत कराल. भागीदारीत चांगला लाभ होईल.

तूळ
नातेवाईकांना मदत कराल. मनातील शंका-कुशंका काढून टाकाव्यात. पैज जिंकता येईल. अचानक धनलाभ संभवतो. देणी फेडता येतील.

वृश्चिक
व्यावसायिक अनुकूलता लाभेल. काही नवीन संधि उपलब्ध होतील. छुप्या शत्रूंचा बंदोबस्त करता येईल. कामाच्या ठिकाणी तुमचा दबदबा राहील. घरात तुमचा प्रभाव राहील.

धनू
जवळचे नातेवाईक भेटतील. जोडीदाराची बाजू समजून घ्या. कामे मनाजोगी पार पडतील. घरगुती वातावरण खेळीमेळीचे असेल. मित्रांशी मनमोकळ्या गप्पा माराल.

मकर
गप्पांचा फड जमवाल. हटवादीपणा बाजूला सारावा. हातातील अधिकार वापरावेत. तुमची महत्वाकांक्षा वाढीस लागेल. सामाजिक वादात अडकू नका.

कुंभ
चंचलतेवर मात करावी. आपल्या अधिकारांची जाणीव ठेवावी. घरगुती गोष्टींत अधिक लक्ष घालाल. मनाजोगी खरेदी कराल. घराची सजावट काढली जाईल.

मीन
दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल. मित्रमंडळींबरोबर फिरायला जाल. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. निसर्गाच्या सानिध्यात रमून जाल. गुरूजनांचा आशीर्वाद लाभेल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button