अवैध दारू तस्करी करणारे दोघांना कोतूळ येथे अटक ६ लाखाचा ऐवज जप्त !

कोतूळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कोतुळ येथे अवैध दारू तस्करी करणाऱ्या दोन आरोपीना पोलिसांनी अटक केली त्यांच्या ताब्यातील पाच लाख चौऱ्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गेल्या अनेक महिन्यांपासून कोतूळ येथील अवैध दारू आणि मटका व्यवसाय चर्चेत आहे अनेक वेळा मागणी करूनही हा अवैध व्यवसाय बंद न होता उलट अवैध दारू मटक्याला बाळसं येत आहे
अकोले पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी या अवैध दारू विक्रीवर नजर ठेवून गुरुवारी मोठी कारवाई केली
गुरुवारी सकाळी दहा वाजता कोतूळ येथील मोडकळीस आलेल्या शासकीय विश्रामगृह येथे काळ्या काचा असलेली सफेद रंगाची बोलेरो (एमएच १४ डीएक्स ८८५३) गाडी आली.असता
पोलिस हवालदार अनिल जाधव यांनी पाळत ठेवून पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांना कळवले. व तातडीने गाडीची झडती घेतली असता गाडीत 33,600 रुपयांचे देशी दारूचे दहा बॉक्स व पाचशे, दोनशे, शंभरची ४० हजार पाचशे रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात केला
जप्त करण्यात आलेली ही दारू कोतूळ येथील अवैध दारू अड्ड्यावर विक्रीसाठी आली होती. गाडी चालक अशुतोष बाळू गुंजाळ (रा.गुंजाळवाडी संगमनेर), अक्षय मारुती वाकचौरे (रा.परखतपूर, ता. अकोले) यांना ताब्यात घेण्यात आले. या कामी पोलिस हेड कॉन्स्टेबल महेंद्र गुंजाळ यांनी फिर्याद दिली. सहायक पोलिस निरीक्षक बाजीराव गवारी यांच्या उपस्थितीत ही कारवाई केली.
अवैध दारु विक्रेते पुरवठादार यांच्यावर पोलीस लक्ष ठेऊन आहे कुठे अवैध दारू विक्री होत असल्यास थेट पोलिसांना संपर्क साधावा.”असे आवाहन पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील,यांनी केले आहे