कडक उन्हाच्या झळांनी पारनेरातील रस्ते सुनसान..!

शहरातील बाजारपेठेची आर्थिक घडी विस्कटली.
दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी :-
कधी नाही एवढे कडक ऊन, सकाळी आठ ते दुपारी चार ते पाच वाजेपर्यंत उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण, कडक उन्हामुळे नागरिक घराचे बाहेर पडायला तयार नाहित.ग्रामीण भागांतील नागरिक गावातच राहणे पसंत करत आहेत.त्यामूळे रस्ते सुनसान झाले आहेत
.शहरातील घाऊक, किरकोळ व्यापाऱ्यांना हातावर हात ठेऊन बसण्याशिवाय पर्याय नाही.परिणामी पारनेर तालुक्यातील व शहरातील व्यापाऱ्यांची आर्थिक घडी विसकटली असल्याचे चित्र दिसून येते आहे.
कधीही नाही ते यंदा पारनेर शहरासह अख्या तालुक्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला असून आज हा पारा जवळपास ४० अंशाच्या घरात पोहोचला गेला असल्याचे चित्र दिसून येत आहे.गेली चार पाच दिवसापासून उन्हाचा पारा अधिकच वाढत चालला असल्याने शहरातील रस्ते सूनसान पडले असून बाजार पेठा देखील ओस पडत असल्याने शहरातील घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे यंदाच्या उन्हाच्या पाऱ्याने बऱ्याच वर्षापासून चा रेकॉर्ड मोडला असून दिवसेंदिवस वाढत चाललेला उन्हाच्या पाऱ्याने जवळपास सरासरी ४० अंशचा पल्ला गाठला आहे .सकाळी आठ वाजल्यापासूनच उन्हाचा पारा वाढत असल्याने दुपारी चार ते पाच वाजेपर्यंत कायम राहत आहे .सतत वाढत चाललेला हा उन्हाचा पारा अत्यंत घातक असल्याकारणाने नागरिक दरम्यानच्या काळामध्ये घराच्या बाहेर न पडता घरातच राहणे पसंत करीत आहेत. परिणामी पारनेर शहरातील नागरिक तर घराच्या बाहेरच पडत नसल्याकारणाने सारे रस्ते ओस पडले आहेत. शहरातील नागरिकांवर शहरालगतच्या ग्रामीण भागातील ग्रामस्थ देखील आपले गाव सोडून पारनेर शहरात येण्यास धजावत नाहीत. ते आपल्या गावातच राहणे पसंत करीत आहेत या सर्व बाबींचा विचार केला तर दिवसेंदिवस वाढत चाललेल्या उन्हाच्या पाऱ्याचा परिणाम शहरातील बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणात होत आहे .ग्राहकच नसल्याकारणाने दुकानदारांना मोठ्या आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.शहरातील किराणा ,कापड दुकानदार ,मशिनरी आदि मोठमोठाले व्यापारी यांच्याकडे १० ते २० नोकरवर्ग आहेत.सहा ते सात तास ग्राहकच नसल्याकारणाने ह्या नोकरांना सदर व्यापाऱ्यांना बसूनच पगार द्यावा लागत आहे. या व्यापाऱ्यांबरोबर पालेभाज्या ,फळ फळावर आदींच्या किरकोळ व्यापाऱ्यांना देखील उन्हाच्या पाण्याची झळ सहन करावी लागत आहे आणि धंद्याच्या वेळेतच ऊन असल्याकारणाने नागरिक घराच्या बाहेर निघत नसल्याने आणि रस्ते ओस पडल्याने त्याचा मोठा परिणाम हा लहानसहान व्यापाऱ्यांना देखील सहन करावा लागत आहे .त्यांची देखील मोठे आर्थिक नुकसान होत असून व्यापार होईल ह्या आशेने देखील खरेदी केलेला भाजीपाला व फळ फळावर वाया जाताना दिसून येत आहे .एकंदरीत परिस्थिती पाहता उन्हाचा पारा कधी कमी होईल हा एकच प्रश्न सर्व व्यापाऱ्यांसमोर पडला आहे.