आजचे पंचांग व राशिभविष्य दि.03/05/2024

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख १३ शके १९४६
दिनांक :- ०३/०५/२०२४,
वार :- भृगवासरे(शुक्रवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:०२,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:५०,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- उत्तरायण
ऋतु :- वसंतऋतु
मास :- चैत्र
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- दशमी समाप्ति २३:२५,
नक्षत्र :- शततारका समाप्ति २४:०६,
योग :- ब्रह्मा समाप्ति १४:१९,
करण :- वणिज समाप्ति १२:४१,
चंद्र राशि :- कुंभ,
रविराशि – नक्षत्र :- मेष – भरणी,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- मेष,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- दु. ०१प. चांगला दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी १०:५० ते १२:२६ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०७:३८ ते ०९:१४ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:१४ ते १०:५० पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी १२:२६ ते ०२:०२ पर्यंत,
❀ दिन विशेष:
घबाड २३:२५ प., भद्रा १२:४१ नं. २३:२५ प.,
————–
🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख १३ शके १९४६
दिनांक = ०३/०५/२०२४
वार = भृगवासरे(शुक्रवार)
मेष
दिवसभर कामाची धावपळ राहील. अती श्रमामुळे थकवा जाणवेल. काही अडचणीतून मार्ग काढता येईल. बदलांकडे सकारात्मकतेने पहावे. घरगुती वातावरण चांगले राहील.
वृषभ
वैचारिक दृष्टिकोन बदलून पाहावा. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. गुरुकृपेचा लाभ उठवावा. तीर्थयात्रेचे योग येतील. दिवस खेळीमेळीत घालवाल.
मिथुन
मुलांची चिंता लागून राहील. स्त्री वर्गापासून दूर राहावे. लबाड लोकांची संगत टाळावी. गुंतवणुकीचा पुनर्विचार करावा. आर्थिक व्यवहार सावधानतेने करावेत.
कर्क
जोडीदाराशी मतभेद संभवतात. मनाची चंचलता टाळण्याचा प्रयत्न करा. अती भावनाविवश होऊ नका. जुन्या गोष्टी उगाळत बसू नये. लहानांच्यात लहान होऊन वावराल.
सिंह
पोटाची काळजी घ्यावी. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. कलेला पोषक वातावरण मिळेल. गोड बोलून फायदा साधून घ्याल. कमिशन मधून चांगली कमाई होईल.
कन्या
मुलांना काही नवीन गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करावा. मतभेदाला खतपाणी घालू नका. नातेवाईकांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत. छुप्या शत्रूंचा विरोध मावळेल. जोडीदाराची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करावा.
तूळ
मुलांच्या धडपडीकडे लक्ष ठेवावे. क्रोधाला बळी पडू नका. कौटुंबिक नैराश्य दूर करण्याचा प्रयत्न करावा. नवीन गुंतवणूक सावधानतेने करावी. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो.
वृश्चिक
प्रवासात क्षुल्लक अडचण येऊ शकते. वाहन चालवताना सतर्कता बाळगावी. पत्नीचे मत विरोधी वाटेल. भावंडांचे प्रश्न भेडसावतील. कौटुंबिक सहलीचा विचार करावा.
धनू
कौटुंबिक खर्च वाढेल. हाताखालील लोक विश्वासू मिळतील. इतरांचा विश्वास संपादन करावा. मत्सराला बळी पडू नका. कामाच्या ठिकाणी समाधान लाभेल.
मकर
नवीन विचारांची कास धरावी. तिखट व तामसी पदार्थ आवडीने खाल. स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल. घरात तुमचा दबदबा राहील. करमणुकीच्या कार्यक्रमात गुंग व्हाल.
कुंभ
शांत व संयमी विचार करावा. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. मनाची चंचलता दूर करावी. धार्मिक स्थळांना भेट द्याल. आध्यात्मिक बळ वाढवावे.
मीन
प्रकृतीच्या बाबतीत हयगय करू नका. सामुदायिक वादात लक्ष घालू नका. मनातील इच्छा पूर्ण होईल. स्त्रियांमुळे मतभेद संभवतात. अती चौकसपणा दर्शवू नका.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर