कोतुळ शहरातील ५३ लक्ष खर्चाचे विकास कामांचे उद्या भूमिपूजन

कोतुळ प्रतिनिधी
कोतुळ शहरातील ५३ लक्ष रुपये खर्चाच्या विकास कामांचे उद्या बुधवार दि 2 रोजी भूमिपूजन करण्यात येणार आहे
कोतुळ गटाचे जिल्हा परिषद सदस्य .रमेशकाका देशमुख यांचे निधीतून व प्रयत्नातून मंजूर झालेल्या
अजिंक्य चौक ते अबितखिंड रोड काँक्रिटीकरण करणे =( १५ लक्ष रु.) साबळेवाडी रस्ता काँक्रेटीकरण करणे = (१० लक्ष रु). मुक्ताई मंदिर ते स्मशानभुमी रस्ता काँक्रेटीकरण = (१० लक्ष रु.)
या कामांचे भूमिपूजन व भांगेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांधकाम करणे = (९.५ लक्ष रु.)
भांगेवाडी अंगणवाडी बांधकाम करणे = (९.४ लक्ष रु.) या कामांचे उदघाटन बुधवार दि.०२.०२.२०२२ रोजी सकाळी १०.०० वा. शेतकरी नेते .श्री.दशरथजी सावंत जिल्हा परिषद सदस्य श्री.रमेशकाका देशमुख , जिल्हा बँकेचे संचालक .श्री.अमितदादा भांगरे यांचे शुभ हस्ते होणार आहे
यावेळी अकोले बाजार समितीचे सभापती श्री.परबतराव नाईकवाडी.माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.बाजीराव दराडे . पुणे बाजार समितीचे माजी प्रशासक श्री.बी.जे. देशमुख शेतकरी नेते डॉ.अजित नवले सरपंच श्री.भास्करराव लोहकरे उपसरपंच श्री.संजयशेठ देशमुख राष्ट्रवादी चे उपादयक्ष.श्री.हेमंत(बबलु) देशमुख श्री.अरुण धराडे सौ.अनुसया धराडे ग्रामविकास अधिकारी श्री.सुभाष जाधव उपभियंता.श्री.दिनकर बंड शाखाभियंता श्री.दिनेश बिंद आदी सह ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित राहणार आहे