इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि.२६/०५/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- ज्येष्ठ ०५ शके १९४६
दिनांक :- २६/०५/२०२४,
वार :- भानुवासरे(रविवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०५:५४,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:५९,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- उत्तरायण
ऋतु :- वसंतऋतु
मास :- वैशाख
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- तृतीया समाप्ति १८:०७,
नक्षत्र :- मूळ समाप्ति १०:३६,
योग :- साध्य समाप्ति ०८:३१,
करण :- वणिज समाप्ति ०६:३६, बव २९:३३,
चंद्र राशि :- धनु,
रविराशि – नक्षत्र :- वृषभ – रोहिणी,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- वृषभ,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- संध्या. ०६नं. चांगला दिवस,

✿राहूकाळ:- संध्या. ०५:२१ ते ०६:५९ पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:१० ते १०:४८ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी १०:४८ ते १२:२६ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०२:०४ ते ०३:४३ पर्यंत,

❀ दिन विशेष:
संकष्ट चतुर्थी (मुंबई चं.उ. २२:०२), भद्रा ०६:३६ नं. १८:०७ प.,
————–


🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
आजचा दिवस सुखाचा जावो मन प्रसन्न राहो!!!!!
💐🌺🌼🌹🌾🍀🌻🌷🌸

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- ज्येष्ठ ०५ शके १९४६
दिनांक = २६/०५/२०२४
वार = भानुवासरे(रविवार)

मेष
नसते साहस करायला जाऊ नका. दूर वरच्या लोकांशी संपर्क वाढेल. मानसिक आंदोलने लक्षात घ्यावीत. आपणच आपल्या रागाला कारणीभूत होऊ शकतो. जमिनीच्या कामात लक्ष घालावे.

वृषभ
मित्रांकडून लाभाची शक्यता. चेष्टा मस्करीत शब्द जपून वापरा. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल. निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्याल. कामातील बदल व्यवस्थित लक्षात घ्या.

मिथुन
संभाषण कौशल्याची आवड पूर्ण कराल. विरोधकांचा विरोध मावळेल. कामात सहकार्‍यांची उत्तम साथ होईल. कामे दिरंगाईने होण्याची शक्यता. सामाजिक वादात अडकू नका.

कर्क
कोणावरही जास्त विसंबून राहू नका. अधिकारी वर्गाचे मार्गदर्शन घ्यावे. मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाईल. स्त्री सौख्यात रमून जाल.

सिंह
मित्रमैत्रिणींचा फड जमवाल. आवडत्या ठिकाणाला भेट देण्याचे ठरवाल. पत्नीची नाराजी दूर करावी लागेल. घरगुती कामात दिवस जाईल. हाताखालील नोकरांचे सहकार्य लाभेल.

कन्या
जवळचा प्रवास मजेत पार पडेल. छंद जोपासला वेळ मिळेल. मानसिक स्थैर्य जपण्याचा प्रयत्न करावा. बाहेरील अन्न पदार्थ खाणे टाळावे. महत्त्वाची कागदपत्रे पुढे सरकतील.

तूळ
जोडीदाराच्या हट्टाला बळी पडाल. आवडते पदार्थ खाण्याची हौस पूर्ण होईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. क्षुल्लक गोष्टींमुळे येणारा राग कमी करावा. नवीन ठिकाणी गुंतवणुकीला वाव आहे.

वृश्चिक
जोडीदाराच्या इच्छेविरूद्ध जाऊ नका. कौटुंबिक वातावरण तप्त राहील. कामाचा विस्तार वाढवता येईल. भागीदारीत तुमच्या विचाराला प्राधान्य राहील. व्यावहारिक दृष्टीकोन ठेवावा लागेल.

धनू
इच्छेला मुरड घालावी लागेल. भावंडांशी वाद वाढवू नयेत. जुन्या कामात अधिक वेळ गुंतून पडाल. जोडीदाराच्या बुद्धिकौशल्याचे आश्चर्य वाटेल. काटकसरीवर भर द्यावा.

मकर
नातेवाईक तुमच्या विरुद्ध जाऊ शकतात. इतरांच्या अविश्वासाला बळी पडू नका. कोणाचाही सल्ला घेताना सावध राहा. अविचाराने वागून चालणार नाही. घेतलेल्या कष्टाचे चीज होईल.

कुंभ
रागाच्या भरात कोणतेही कृती करू नका. बुद्धिकौशल्याचा योग्य वेळी वापर करावा. अचानक डोकेदुखीचा त्रास जाणवेल. कामात स्थिरता ठेवावी. कुटुंबात तुमचा दबदबा राहील.

मीन
जवळचे नातेवाईक भेटतील. मनातील आकांक्षा पूर्ण होतील. गुरूजनांच्या आशीर्वादाचा लाभ होईल. तुमच्यातील महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button