आजचे पंचांग व राशिभविष्य दि.27/05/2024

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- ज्येष्ठ ०६ शके १९४६
दिनांक :- २७/०५/२०२४,
वार :- इंदुवासरे(सोमवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०५:५४,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:५९,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- उत्तरायण
ऋतु :- वसंतऋतु
मास :- वैशाख
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- चतुर्थी समाप्ति १६:५४,
नक्षत्र :- पूर्वाषाढा समाप्ति १०:१४,
योग :- शुभ समाप्ति ०६:३७, शुक्ल २८:२७,
करण :- कौलव समाप्ति २८:११,
चंद्र राशि :- धनु,(१६:०५नं. मकर),
रविराशि – नक्षत्र :- वृषभ – रोहिणी,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- वृषभ,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी ०७:३२ ते ०९:१० पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
अमृत मुहूर्त — सकाळी ०५:५४ ते ०७:३२ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ०९:१० ते १०:४८ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०३:४३ ते ०५:२१ पर्यंत,
अमृत मुहूर्त — संध्या. ०५:२१ ते ०६:५९ पर्यंत,
❀ दिन विशेष:
घबाड १०:१४ नं., मृत्यु १०:१४ नं., चतुर्थी श्राद्ध,
————–
🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- ज्येष्ठ ०६ शके १९४६
दिनांक = २७/०५/२०२४
वार = इंदुवासरे(सोमवार)
मेष
अति कामामुळे थकवा जाणवेल. नसते साहस करायला जाऊ नका. प्रवासाला दिवस अनुकूल आहे. जमिनीची कामे सावधपणे करावीत. मुलांच्या वागण्याकडे लक्ष ठेवावे.
वृषभ
सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल. कौटुंबिक जबाबदार्या उत्तमरीत्या पार पाडाल. गायन कलेचे कौतुक केले जाईल.
मिथुन
सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल. व्यवसायानिमित्त खर्च होईल. कामातील बदल लक्षात घ्यावेत. प्रवासात वाहन जपून चालवावे. आरोग्याची वेळेवर काळजी घ्यावी.
कर्क
सगळ्याच कामात दिरंगाई जाणवेल. सहकार्यांशी मतभेद संभवतात. कर्ज घेण्याचा विचार टाळावा. जुगारात नुकसान संभवते. सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा लागेल.
सिंह
दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीचा विचार करावा. जीवावर उदार होऊ नका. विरोधक शांत राहतील. कौटुंबिक गोष्टी धीराने हाताळाव्यात. जवळच्या प्रवासात सतर्क राहावे.
कन्या
भावंडांकडून त्रास संभवतो. मुलांच्या शिक्षणाची चिंता वाटेल. सहकार्यांचा हट्ट पुरवावा लागेल. अपचनाचा त्रास जाणवेल. आर्थिक कमाई वाढेल.
तूळ
काही गोष्टी अचानक सामोर्या येऊ शकतात. कामानिमित्त दूरच्या लोकांशी संबंध येऊ शकतो. क्षुल्लक गोष्टीवरून चिडचिड होऊ शकते. तुमच्याविषयी गैरसमज होऊ शकतात. विरोधकांकडे लक्ष ठेवावे लागेल.
वृश्चिक
अति साहस करायला जाऊ नका. घरातील वातावरण तप्त राहील. मुलांविषयी चिंता लागून राहील. शक्यतो मुलांच्या कलाने घ्यावे लागेल. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल.
धनू
मानसिक चिंता सतावतील. मनातील चुकीचे विचार काढून टाकावेत. सकस अन्न ग्रहण करावे. मोठे व्यावसायिक बदल करण्याचा विचार कराल. महत्त्वाकांक्षा बाळगावी लागेल.
मकर
प्रवासात खबरदारी घ्यावी. तुमच्यातील कलेला चांगली दाद मिळेल. मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींनी सजग राहावे. फक्त स्वत:च्या लाभाचा विचार करू नका. अनाठायी खर्च होईल.
कुंभ
बँकेची कामे सुरळीत पार पडतील. आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी. कामाच्या ठिकाणी सावधपणे वागावे. सहकारी तुमच्यावर नाराज होऊ शकतात. वडीलधार्यांचा मान राखावा.
मीन
पत्नीचे सौख्य वाढीस लागेल. चारचौघात तुमचा मान वाढेल. स्थावरची कामे मार्गी लागतील. घरातील स्त्रीवर्ग खुश असेल. तुमच्या कामाची योग्य दखल घेतली जाईल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर