आजचे पंचांग व राशिभविष्य दि.०८/०६/२०२४

: 🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- ज्येष्ठ १८ शके १९४६
दिनांक :- ०८/०६/२०२४,
वार :- मंदवासरे(शनिवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०५:५३,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०७:०३,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- उत्तरायण
ऋतु :- वसंतऋतु
मास :- ज्येष्ठ
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- द्वितीया समाप्ति १५:५६,
नक्षत्र :- आर्द्रा समाप्ति १९:४२,
योग :- गंड समाप्ति १८:२७,
करण :- तैतिल समाप्ति २७:४५,
चंद्र राशि :- मिथुन,
रविराशि – नक्षत्र :- वृषभ – मृग,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- वृषभ,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी ०९:११ ते १०:५० पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०७:३२ ते ०९:११ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०२:०७ ते ०३:४६ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०३:४६ ते ०५:२५ पर्यंत,
❀ दिन विशेष:
रंभाव्रत, व्दितीया श्राद्ध,
————–
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- ज्येष्ठ १८ शके १९४६
दिनांक = ०८/०६/२०२४
वार = मंदवासरे(शनिवार)
मेष
उगाच कसली तरी कमतरता जाणवेल. मनातील चुकीच्या विचारांना आवर घालावी लागेल. कौटुंबिक सौख्य वृद्धिंगत होईल. नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल. वरिष्ठांना खुश ठेवावे लागेल.
वृषभ
कौटुंबिक रूसवे-फुगवे दूर करावे लागतील. जबाबदारीची जाणीव ठेवून वागावे. कामात सहकार्यांची मदत मिळेल. परिस्थितीनुसार कामात काही बदल करावे लागतील. मैत्रीतील जिव्हाळा वाढीस लागेल.
मिथुन
इतरांवर विसंबून राहू नका. गप्पा मारण्यात वेळ वाया घालवून चालणार नाही. लोकांचा तुमच्याबाबत गैरसमज होऊ शकतो. जोडीदाराच्या सौख्याला बहर येईल. मनातील इच्छा पूर्ण होईल.
कर्क
प्रतिकूलतेतून कष्टाने कामे करत राहाल. पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. अपुरी कामे पूर्णत्वास जातील. जवळचे मित्र भेटतील.
सिंह
मनोरंजनातून आनंद घ्याल. मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. सढळ हाताने मदत कराल. जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. विरोधकांवर लक्ष ठेवावे.
कन्या
अपचनाचा त्रास जाणवेल. क्षुल्लक कारणाने नाराज होऊ नका. स्वभावात काहीसा चिडचिडेपणा येईल. वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे. कमिशन मधून लाभ संभवतो.
तूळ
मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या. कौटुंबिक गोष्टीत संयम बाळगावा. जवळच्या प्रवासाचे योग आहेत. शेअर्सच्या व्यवहारातून लाभ संभवतो. कामात नवीन पर्यायांचा अवलंब करावा.
वृश्चिक
किरकोळ कौटुंबिक कटकटी राहतील. अनावश्यक खर्चावर ताबा ठेवावा. मनात नसत्या शंका आणू नका. विद्यार्थ्यांना अभ्यासात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. हाताखालील लोकांवर विसंबून राहू नका.
धनू
मुलांचे वागणे त्रासदायक वाटू शकते. भौतिक गोष्टींवर अधिक खर्च कराल. शिस्तीचा फार बडगा करून चालणार नाही. मित्रांकडून कौतुक केले जाईल. प्रवास सावधानतेने करावा.
मकर
कामात उगाचच खो बसल्यासारखा वाटू शकतो. प्रकृती स्वास्थ्याकडे दुर्लक्ष नको. थोडी चिडचिड कमी करावी. जुन्या गोष्टी मनाला दुखवू शकतात. अति विचार करू नका.
कुंभ
दुराग्रहीपणे निर्णय घेऊ नका. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. घरगुती कामात रमून जाल. इच्छा नसताना प्रवास करावा लागेल. घरासाठी काही नवीन वस्तु खरेदी केल्या जातील.
मीन
मनावरील ताण दूर सारावा. कौटुंबिक प्रश्नातून मार्ग काढावा. घरी मोठ्या लोकांची ऊठबस राहील. सामाजिक जाणिवेतून काम कराल. आवडी-निवडी बाबत आग्रही राहाल.