इतर

त्रिशूळवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना शिवकल्याण फाउंडेशन कडून साहित्य वाटप,

अकोले प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील   जांभळेवाडी केंद्रातील .  दुर्गम भागातील जि. प.प्रा शाळा त्रिशूळवाडी ता अकोले शाळेतील विद्यार्थ्यांना शिवकल्याण फाउंडेशन वाघोली,पुणे यांच्या वतीने व फोपसंडी येथील  आदिवासी सेवक दत्तात्रय मुठे यांच्या सहकार्यामुळे आज विद्यार्थ्यांना  स्कूल बॅग,पाणी बॉटल,वह्या,कंपास,पेन,व पॅड यांचे वाटप  सातेवाडी चे लोकनियुक्त सरपंच श्री केशव बुळे , ग्रा.सदस्य श्री लक्ष्मण मुठे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षश्री भास्कर जोशी श्री जिजाराम मुठे ,एकनाथ मुठे ,लुमा मुठे  यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

 शाळेसाठी व केंद्रासाठी  शिक्षण विस्तार अधिकारी श्री अरविंद कुमावत  व केंद्रप्रमुख  श्री भवरे यांचे वेळोवेळी मार्ग दर्शन  लाभले .

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक  श्री विकास झरेकर ,उपाध्यापक श्री बाळासाहेब वळे  व ग्रामस्थ उपस्थीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button