भारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय कार्यकारणी च्या बैठकीचे आयोजन

पुणे दि 13
भारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय कार्यकारणींची बैठक दि 15,16 , 17 ऑगस्ट 2024 रोजी रामभाऊ म्हाळगी प्रबोधीनी उत्तान येथे आयोजित केली आहे.
या बैठकीत भारतीय मजदूर संघाच्या 70 वर्ष पुर्ण झाली त्या निमित्ताने पंच परिवर्तन च्या कार्यक्रमांचे नियोजन, विविध उद्योगातील समस्या बाबतीत चर्चा, नियोजन, 23 जुलै वर्धापन दिनाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमांचा आढावा, संघटित व असंघीटत क्षेत्रातील कामगारांच्या विविध विषयांवर चर्चा, योजना ,अंमलबजावणी करण्यासाठी , आदी बाबतीत केंद्रीय कार्यकारिणी मध्ये सविस्तर चर्चा होणार आहे.
या बैठकीचे अध्यक्षस्थानी भारतीय मजदूर संघाचे केंद्रीय अध्यक्ष श्री हिरण्यमय पंड्या असणार आहेत, या बैठकीत केंद्रीय महामंत्री रविंद्र हिमते, संघटन मंत्री श्री बी सुरेंद्रन, व विविध राज्यातील व उद्योगातील केंद्रीय पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत.
या बैठकीचे नियोजन, भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी करित असल्याची माहिती भारतीय मजदूर संघ प्रसिद्धी प्रमुख सागर पवार यांनी दिली