आजचे पंचांग व राशिभविष्य दि ०९/०२/२०२२

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- माघ २० शके १९४३
दिनांक = ०९/०२/२०२२
वार = सौम्यवासरे(बुधवार)
मेष
कलासक्त दृष्टीकोन वाढीस लागेल. मैत्रीचे नवीन संबंध जुळून येतील. आवडीचे पदार्थ खाल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. आनंदी दृष्टीकोन बाळगाल.
वृषभ
दिवस मनाजोगा घालवाल. काही गोष्टी जाणीवपूर्वक लपवाल. तुमची उत्तम छाप पडेल. जिभेवर साखर ठेवून बोलाल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.
मिथुन
मानसिक चंचलता जाणवेल. मैत्रीचे संबंध घट्ट होतील. कामात स्त्रियांची मदत मिळेल. वागण्यात शालीनता दाखवाल. उत्तम व्यावसायिक लाभ होईल.
कर्क
कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण असेल. गोड बोलून कामे साध्य करता येतील. कलागुण उत्तमरीत्या प्रकट होतील. घराची सजावट कराल. व्यवसायात समाधानकारक वातावरण राहील.
सिंह
कामात स्थिरता ठेवावी. धार्मिक वृत्तीत वाढ संभवते. इतरांना आनंदाने मदत कराल. पित्तविकार बळावू शकतात. इतरांच्या विश्वासास पात्र व्हाल.
कन्या
काही कामे कमी श्रमात पार पडतील. अचानक धनलाभ संभवतो. रेस, सोडत यातून लाभ संभवतो. बौद्धिक ताण राहील. आपलेच म्हणणे खरे कराल.
तूळ
वैवाहिक सौख्यात वाढ होईल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. शेअर्स मधून लाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी समाधानी राहाल. कौटुंबिक बाबीत दुर्लक्ष करू नका.
वृश्चिक
जोडीदाराचे प्रेमळ सौख्य लाभेल. भागीदारीत खुश राहाल. संपर्कातील लोकांचा जिव्हाळा वाढेल. इतरांच्या मताचा आदर करावा. हट्टीपणा दूर सारावा लागेल.
धनू
खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. फार अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरेल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. तुमचे धाडस वाढेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे.
मकर
मनातून निराशा दूर सारावी. अडथळ्यातून मार्ग काढावा. खर्चाचे योग्य नियोजन करावे. मुलांचा आनंद द्विगुणित होईल. उधारीचे व्यवहार सावधानतेने करावेत.
कुंभ
मैत्रीत कटुता येणार नाही याची काळजी घ्यावी. उगाच चिडचिड करू नका. आपली संगत एकवार तपासून पहावी. जवळचा प्रवास मजेत कराल. कौटुंबिक जिव्हाळा वाढेल.
मीन
आवडत्या लोकांच्यात रमून जाल. बोलण्यात मधाळपणा जपाल. कामाच्या ठिकाणी संबंध जपाल. सामाजिक कामात पुढाकार घ्याल. इतरांवर आपली उत्तम छाप पाडाल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
:
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- माघ २० शके १९४३
दिनांक :- ०९/०२/२०२२,
वार :- सौम्यवासरे(बुधवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०७:०१,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:२६,
शक :- १९४३
संवत्सर :- प्लव
अयन :- उत्तरायण
ऋतु :- शिशिरऋतु
मास :- माघ
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- अष्टमी समाप्ति ०८:३१,
नक्षत्र :- कृत्तिका समाप्ति २४:२३,
योग :- ब्रह्मा समाप्ति १७:५०,
करण :- बालव समाप्ति २१:४८,
चंद्र राशि :- वृषभ,
रविराशि – नक्षत्र :- मकर – धनिष्ठा,
गुरुराशि :- कुंभ,
शुक्रराशि :- धनु,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- अनिष्ट दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी १२:४४ ते ०२:०९ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०७:०१ ते ०८:२७ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०८:२७ ते ०९:५२ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ११:१८ ते १२:४४ पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०५:०० ते ०६:२६ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
बुधाष्टमी,
————–
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर
🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
💐🌺🌼🌹🌾🍀🌻🌷🌸