जामगाव येथे देशमुख महाविद्यालयाच्या रासेयो शिबिराचे उद्घाटन!

राजूर: प्रतिनिधी
जामगाव, ता. अकोले येथे मंगळवारी अॅड्. एम. एन. देशमुख कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराचे उद्घाटन राजूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. नरेंद्र साबळे यांच्या शुभहस्ते पार पडले.
उद्घाटन कार्यक्रमात बोलताना नरेंद्र साबळे यांनी तरुण हे राष्ट्राचा पाया असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेतून देशसेवेचा व समाज सेवेचा संस्कार घेण्याचे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांना नागरी सेवेत जाण्यासाठी मार्गदर्शन केले. याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात बोलताना सत्यनिकेतन संस्थेचे सचिव माजी प्राचार्य टी. एन. कानवडे सरांनी स्वयंसेवकांना राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास व महत्त्व समजावून सांगितले. तसेच राष्ट्रीय सेवा योजना ही श्रमसंस्कार करणारी एक संस्था असल्याचे प्रतिपादन केले. याप्रसंगी बोलताना सत्यनिकेतन संस्थेचे सहसचिव मिलिंदजी उमराणी यांनी स्वयंसेवकांना शिस्त पाळण्याचे आवाहन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख यांनी रासेयो स्वयंसेवकांना गावकऱ्यांशी संवाद साधण्याचे व शिबिराच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास घडवून आणावा असे आवाहन केले. सत्यनिकेतन संस्थेचे व्यवस्थापक प्रकाश महाले यांनीही याप्रसंगी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. जामगावचे माजी सरपंच उषाताई पारधी, माजी उपसरपंच प्रकाश महाले सरांनी व पोलीस पाटील गिताराम महाले, जामगाव ग्रामपंचायतीचे प्रशासक चव्हाणसाहेब, ग्रामसेवक एच. एन. दातीर, शाळेचे मुख्याध्यापक सुपे सर यांनी शिबिराला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सत्यनिकेतन संस्थेचे सचिव माजी प्राचार्य टी. एन. कानवडे सर यांनी भूषवले. प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा. बबन पवार यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. संतोष अस्वले यांनी केले, आभार प्रदर्शन प्रा. नितीन लहामगे यांनी केले. कार्यक्रमाला रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. राजेंद्र सोनवणे, प्रा. डॉ. दीपमाला तांबे, प्रा. हनुमंत काकडे, प्रा. लहू काकडे, प्रा. डॉ. वाल्मिक गीते, प्रा. विशाल पवार, प्रा. किरण कानवडे, प्रा. राजेंद्र कासार, प्रा. विलास रोंगटे, पत्रकार श्री. विलास तुपे, श्री. पांडू पथवे, विलास लांघी, किरण शेळके आदी मान्यवर हजर होते.
