इतरनाशिक

३१ऑगस्ट ला नाशिक मध्ये आर एम बी ची डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स

नाशिक प्रतिनिधी

मैत्रीपूर्ण संबंधातून व्यवसाय वृद्धी करण्याच्या दृष्टिकोनातून कार्यरत रोटरी मीन्स बिजनेस  (आरएमबी) डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स आयोजित करत आहे.

नाशिक ,जळगाव,नागपूर येथील विविध व्यवसायिक,उद्योजक ह्या कॉन्फरन्स ला उपस्थीत राहणार आहेत.

कॉन्फरन्स साठी रजिस्ट्रेशन आवश्यक असून त्यासाठी अध्यक्ष रोटे अमित पगारे ह्याना संपर्क करावा असे आव्हान आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे  आरएमबी चे आंतरराष्ट्रीय संचालक रोटे.महेश सप्तर्षी, रोटरी डिस्ट्रिक्ट चे प्रांतपाल रोटे. राजींदर सिंग खुराणा व स्पेक्ट्रम इलेक्ट्रिक जळगाव चे व्यवस्थापकीय संचालक श्री दिपक चौधरी हे प्रमुख वक्ते उपस्थित राहणार आहेत.

रोटे.दिपक पाटील हे कव्हेनर ,

आरएमबी क्लब अध्यक्ष रोटे.अमित पगारे व रोटे प्रसन्न जैन  हे समन्वयक  तर आर एम बी चे सह संस्थापक तथा मार्गदर्शक डिस्ट्रिक्ट चेअरमन रोटे. डॉ.गौरव सामनेरकर व रोटरी क्लब ऑफ नाशिक अध्यक्ष रोटे ओमप्रकाश रावत यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे.

मैत्री , विश्वास आणि पारदर्शकता हि आरएमबी सभासदांच्या यशस्वी व्यवसायाची त्रिसूत्री आहे.

कोणतेही रोटेरियन सभासद हे आरएमबी क्लबचे सभासद होऊ शकतात. रोटरी सभासदांमध्ये जास्तीत जास्त व्यावसायिक संबंध प्रस्थापित करणे,  उद्योग विकासाला चालना देणे यासाठी आरएमबी क्लब प्रयत्नशील असतो. रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 मध्ये पाच   आरएमबी क्लब असून, कार्यक्रमास आरएमबी जळगाव, नागपूर व मालेगाव चे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमात नाशिक मधील उद्योजक ,व्यवसायिक ,व्यापारी यांनी लाभ घ्यावा असे आव्हान अध्यक्ष रोटे अमित पगारे ,उपाध्यक्ष रोटे.उन्मेश देशमुख व खजिनदार रोटे.सलील केळकर यांनी केले आहे.

कॉन्फरन्स चे मुख्य आकर्षण हे व्यावसायिक चर्चासत्र सर्व सहभागी व्यवसायिक ह्याना प्रेजेंटेशन,वयक्तिक व्यवसाय मार्गदर्शन, शंका समाधान हे असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button