इतर

वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांना 19% वेतन वाढ मिळणार, वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने स्वागत

मुंबई दि9

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे ऊर्जामंत्री .ना.देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सह्याद्री शासकीय निवासस्थानी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाची मीटिंग घेतली या वेळी वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांना 19% वेतन वाढ फरकासह देण्यात येण्यात येणार आहे.

जाॅब सिक्युरिटी म्हणून केवळ कंत्राटदार बदलला म्हणून एकतर्फीपणे कामावरून कमी करता येणार नाही.
महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत रू पाच लाख पर्यंत आरोग्य विमा लाभ देण्यात येईल. राष्ट्रीयीकृत बँकेत खाते काढुन त्या माध्यमातून अपघात विमा देणार, कोर्ट केस लिस्ट संपर्क पोर्टल ला जोडणार, नोकरीत कंत्राटी कामगारांना वयात सवलत देनार, सर्वांना कंपनीच्या लोगो चे आयकार्ड देणार, 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत वीज उद्योगाला स्वतंत्र श्रेणी लागू करणार बेकायदेशीर कृती करणारे कंत्राटदारावर कायद्यातील तरतूदी नुसार कारवाई करण्यात येईल.

सदरील वेतन वाढ ही दि मार्च 2024 पासून लागू होणार आहे. कोर्ट केस ।व अन्यायग्रस्त कामावरून कमी केलेल्या कामगारांना कामावर रुजू करून घेण्यात येईल.

हरियाना सरकार प्रमाणे कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगाराची मागणी केली आहे त्या बाबतीत सरकार पातळीवर अभ्यास करून कामगारांना न्याय देण्यात येईल असे आस्वासन ना देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) संघटनेला दिले आहे.

कंत्राटदार कामगारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक मानसिक व सामाजिक शोषण करतात त्यामुळे या साठी महाराष्ट्र शासनाने ठोस व धोरणात्मक निर्णय घेऊन या शोषित पीडित कामगारांना न्याय दिला पाहिजे व या वेळी सरकारचे स्वागत केले आहे, अशी भूमिका संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात यांनी केले आहे.
या वेळी महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांच्या लढा यशस्वीपणे भाग घेतलेल्या व भारतीय मजदूर संघावर विश्वास ठेवलेल्या सर्व कामगारांचे अभिनंदन सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी केले आहे.

पुढीले काळात कामगारांच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मक असून चर्चा मार्फत कामगारांना न्याय देण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळला दिले.

या मीटिंग साठी भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल ढुमणे, महामंत्री किरण मिलगीर, भारतीय मजदूर संघ विदर्भ प्रदेश सरचिटणीस गजानन गटलेवार, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे प्रदेश अध्यक्ष निलेश खरात, महामंत्री सचिन मेंगाळे, कोषाध्यक्ष सागर पवार, उपमहामंत्री राहुल बोडके, महावितरण सचिव अभिजीत माहुलकर, योगेश सायवनकर, विदर्भ प्रतिनिधी अंकुश डोंगरवार, कोकण प्रतिनिधी कमाल खान, पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी, राहुल भालभर, मराठवाडा प्रतिनिधी मारुती गुंड, महानिर्मिती उपाध्यक्ष मोहन देशमुख,विनोद बनसोड, विलास गुजरमाळे, विकास अडबाले व अन्य अनेक कामगार प्रतिनिधी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button