रोटरी क्लब ऑफ नाशिक चा नेशन बिल्डर पुरस्कार सोहळा संपन्न

नाशिक प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ नाशिक चा नेशन बिल्डर पुरस्कार सोहळा रोटरी हॉल गंजमाळ नाशिक येथे दिनांक २१/०९/२४ ला अतिशय प्रेरणादायी वातावरणात पार पडला .ह्या ९ महिला शिक्षकांचा पुरस्कार व प्रशस्तीपत्र देवून झाला सन्मान.
1)सौ . वंदना तुळशिराम भोये
विठ्ठलराव पटवर्धन उत्कर्ष आश्रमशाळा, वाघेरा
2) सौ . प्रमिला श्रीराम शिंदे
श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय , नाशिक
3) सौ . निवेदिता स्वन्पिल पोतदार
विद्या प्रबोधिनी प्रशाला नाशिक
4) सौ . लता विष्णू आव्हाड
भावना चांडक (फलोर) महानँब स्कूल फॉर ब्लाईन्ड , नाशिक
5) सौ . छाया नामदेव माळी
नाशिक महानगर पालिका शाळा क्र.४३ , नाशिक
6) सौ . सुनंदा रावसाहेब सोर
श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालय,नाशिक-
7) सौ. वैशाली दिपक बर्वे
सावित्रीबाई फुले माध्यमिक आश्रमशाळा , महिरावणी , नाशिक
8) सौ . सुरेखा मोहन गावित
उन्नती माध्यमिक विद्यालय , नाशिक
9) सौ. मालश्री महेश ठाकुरदास (शुक्ला )
ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूल , नाशिक

कार्यक्रमाच्या प्रमुख अथिती आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालक श्रीमती लीना बनसोड यांनी श्रोत्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात शिकण्यासाठी वयाची अट नसते हि भावना आपल्या वडिलांचे उदाहरण देत व्यक्त केली .वडिलांनी वयाच्या 96 वर्षी दुसऱ्या पीएचडी ची तयारी करत असताना त्यांचे निधन झाले हे सांगतांना लिना बनसोड ह्या भावुक झाल्या. कुटुंबातून आपल्याला शिक्षणाचा आणि समाजासाठी काही तरी वेगळे करण्याचा समृद्ध वारसा मिळाला. शालेय जीवनात असतानांच सामाजिक विषमतेच्या दाहक परिणामांची जाणीव झाली आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या सत्ता आणि साधन यांचा वापर करून सामाजिक विषमता नक्की दूर करता येईल या जाणिवेने आपण प्रशासकीय सेवेत प्रवेश केला असे प्रेरणादायी विचार लीना बनसोड ह्यानी व्यक्त केले.
दुर्गम भागात राहणारे आदिवासी रुढार्थाने समृद्ध नसले तरी त्यांच्या जगण्याच्या जाणिवा अतिशय समृद्ध आहेत. त्यांना आर्थिक रित्या सबल करण्यासाठी आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आदिवासी विकास महामंडळ त्यांच्या उत्पादनांसाठी बाजारपेठ मिळवून देण्याचे कार्य करीत आहे. वन संपदेतून निर्माण केलेली विविध उत्पादने उत्कृष्ट पॅकिंग करून लवकरच विक्री साठी उपलब्ध होणार आहेत. रोटरी क्लब ने या उपक्रमात सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला .
कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर त्यांनी अध्यक्ष। आणि सेक्रेटरी यांच्या समवेत रोटरी करीत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेतली व वंचित आदिवासी बांधवांपर्यंत विकासाची गंगा पोहोचविण्यासाठी रोटरी माध्यमाचे कार्य करू शकेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
रोटरी क्लब ऑफ नाशिक चे अध्यक्ष ओमप्रकाश रावत ह्यानी पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे कार्य हे सर्व शिक्षकांना एक आदर्श व मार्गदर्शक असल्याचे गौरवोदगार काढले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ सुप्रिया मांगुळकर, मोना सामनेरकर ह्यानी केले तर आभार प्रदर्शन सचिव शिल्पा पारख ह्यानी केले.
रो

रोटरी क्लब ऑफ नाशिक करीत असलेल्या विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रमांविषयी शिक्षकांनी गौरवोद्गार काढलेकार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ नाशिक चे नियोजित अध्यक्ष डॉ गौरव सामनेरकर ,प्रकल्प सचिव हेमराज राजपूत , जनसंपर्क संचालक निलेश सोनजे, लिट्रसी संचालक डॉ सोनाली चिंधडे,डॉ गौरी कुलकर्णी,रवी महादेवकर,विजय दीनानी,विनायक देवधर, रेखा पटवर्धन,ऊर्मिला देवधर हे उपस्थित होते.
नेशन बिल्डर पुरस्कार समिती विशेषतः चेअरमन सुरेखा राजपूत ह्यानी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले, त्याबद्दल कार्यक्रमाचे विशेष अतिथी उप प्रांतपाल ओंकार महाले ह्यानी अभिनंदन केले.
