स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या पारनेर तालुकाध्यपदी प्रविण साळवे

दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी
पारनेर शहरातील विनायक विद्या मंदिर येथील उपक्रमशील शिक्षक तसेच संघटनात्मक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे प्रविण साळवे (सर )यांची स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे राज्यध्यक्ष के. पी .पाटील,जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे, जिल्हा कार्यकारिणी तालुका अध्यक्ष नाशिक विभाग संघटक आंतोन मिसाळ यांच्या मान्यतेने प्रवीण साळवे यांची पारनेर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी अधिकृत नियुक्ती पत्र दिले आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष यांनी सांगितले की साळवे सरांच्या नियुक्ती संघटना वाढीसाठी फायदा होईल शिक्षकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविण्यासाठी साळवे यांच्या माध्यमातून पुढाकार घेतला जाणार आहे. या प्रसंगी प्रवीण साळवे यांनी सांगितले की स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर राहून संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. साळवे यांच्या नियुक्ती मुळे पारनेर, अहील्यानगर, शिरूर, श्रीगोंदे, येथील सामाजिक, राजकिय प्रतिष्ठित व्यक्तींनी अभिनंदन केले आहे.