बँक ऑफ महाराष्ट्र रिटायर्ड एम्प्लॉईज वेलफेअर ऑर्गनायझेशनचे रौप्यमहोत्सवी अधिवेशन पुणे येथे संपन्न

पुणे/प्रतिनिधी
भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र रिटायर्ड एम्प्लॉईज वेलफेअर ऑर्गनायझेशनचे रौप्यमहोत्सवी अधिवेशन दिनांक २१ व २२सप्टेंबर रोजी येथील मॉडर्न महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये हे द्वैवार्षिक अधिवेशन थाटात संपन्न झाले.
या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रिय राज्यमंत्री सहकार व नागरी उड्डयन,भारत सरकार,- मुरलीधर मोहोळ हे उपस्थित होते.मुरलीधर मोहोळ यांनी “राष्ट्रीयकृत बँकेतील निवृत्ती वेतन धारकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन उपस्थित सदस्यांना दिले. बँक ऑफ महाराष्ट्र निवृत्त कर्मचारी संघटना राबवीत असलेल्या विविध प्रकल्पांची प्रशंसा करुन विशेषतः स्वतःच्या निवृत्तीवेतन मधून जमा केलेली रक्कम “सामाजिक कृतज्ञता निधी समर्पण” योजने मार्फत विविध गरजू सामाजिक संस्थांना आत्तापर्यंत दोन कोटी रुपयांची आर्थिक मदत सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक सामाजिक संस्थांना दिले आहे हे प्रशंसनीय कार्य आहे” प्रतिपादन केले.

या कार्यक्रम प्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक आशिष पांडे हे आवर्जुन उपस्थित होते.आशिष पांडे यानी निवृत्त कर्मचारी संबंधी प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे यावेळी आश्वासन दिले.या अधिवेशनात संपूर्ण देशभरातून आठशे बँकेचे निवृत्त कर्मचारी सभासद उपस्थित होते.
व्यासपीठावर संघटनेचे संस्थापक मार्गदर्शक बाळासाहेब फडणवीस,ज्येष्ठ नागरिक संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस वसंत पिंपळापुरे,अध्यक्ष मोहन घोळवे,बोमोचे एस यू देशपांडे,संघटनेचे कार्याध्यक्ष भास्कर माणकेश्वर,सरचिटणीस नारायण अचलेरकर,मोहन शनवारे आदींची मुख्य उपस्थिती होती.
या अधिवेशनात अध्यक्षपदी मोहन घोळवे,कार्याध्यक्ष पदी भास्कर माणकेश्वर, सरचिटणीसपदी नारायण अचलेरकर
कोषाध्यक्ष – चंद्रशेखर बोरोले,सह कोषाध्यक्ष -मुकुंद एरंडे याची दोन वर्षासाठी निवड निर्वाचन अधिकारी व नोबो चे नेते आर आर कुलकर्णी यांनी घोषित केली.