पारनेर जामगाव रस्ता वर दिशा दर्शक फलक लावणे आवश्यक-सतीश म्हस्के,

पारनेर दि.६
पारनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या कोणत्याही रस्त्याची दुरुस्ती करावयाची असल्यास रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाश्यांना कोणत्याही प्रकारची शाररिक इजा होऊ नये म्हणुन खबरदारी घेण्यासाठी रस्ता दुरुस्ती ठिकाणी दिशा दर्शक फलक लावणे जरुरीचे असते. पण संबंधित ठेकेदार यांनी या नियमाला डावलून रस्त्याचे काम सुरु केले आहे. पारनेर जामगाव रस्ता अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे. संबधित विभागाने रस्त्याचे काम सुरु करते वेळी ‘ रस्त्याचे दुरुस्ती काम चालू आहे ‘ असा फलक लावणे आवश्यक आहे. पण रस्त्याचे काम गेली दोन दिवस सुरु आहे पण अजूनही नागरीकांच्या सुरक्षेसाठी असा फलक लावण्यात आलेला नाही. वाटसरू नागरिकाचा शारीरिक इजा होऊ नये म्हणुन तातडीने या चौकात दिशादर्शक फलक लावण्यात यावा अशी मागणी पारनेर तालुका मनसे उप तालुकाध्यक्ष सतिश म्हस्के यांनी केली आहे.
सविस्तर माहिती अशी की, गेल्या काही महिन्या पासून पारनेर जामगाव या रस्त्याची दुरवस्था अत्यंत दयनीय झालेली होती. जागो जागी मोठ मोठाले खड्डे तयार झाल्याने पारनेर जामगाव रस्त्यावरून वाहन धारक यांना मोठी कसरत करावी लागत होती. या खड्ड्या मुळे अनेक प्रवाश्यांना शारीरिक लहान मोठया जखमा झालेल्या होत्या. बरेच दिवस या रस्त्यांवर मुरूम व खडी टाकण्यासाठी आणून टाकली होती पण प्रत्यक्षात रस्ता दुरुस्तीचे काम करण्यात येत नव्हते. पण गेल्या दोन दिवसा पासून या रस्त्याचे काम संबधित विभागाने तातडीने सूरू केलेले आहे. पारनेर जामगाव या जुन्या रस्त्याचे काम करणेसाठी जेसीबीचे साहाय्याने खोद काम करण्यात येत आहे. त्यामुळे या रस्ता खोल झालेला आहे. या दुरुस्ती रस्त्यांवर काम सूरू करण्याअगोदर रस्ता नियमाने दिशा दर्शक फलक लावणे आवश्यक असताना संबधित विभागाने जाणीव पूर्वक दुर्लक्ष केलेले आहे. दिशादर्शक फलक नसल्यानें रात्रीचे वेळी अचानक वाहन धारकाचा या रस्त्यांवर अपघात होण्याची दाट शक्यता आहे. या विभागाने रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरीकांच्या सुरक्षा दृष्टीने तातडीने रस्ता दुरूस्ती ठिकाणीं दिशा दर्शक फलक लावणे आवश्यक आहे. अशी मागणी परिसरातील नागरीक करत आहेत.
: पारनेर जामगाव रस्ता दुरुस्ती काम सूरू करते वेळी नागरीकांच्या सुरक्षासाठी दिशादर्शक फलक लावणे जरुरीचे आहे. संबधित अधिकारी यांना फोन केलेला आहे त्यांनी तातडीने दखल घेउन संबधित ठेकेदार यांना अवगत केले आहे.
सतिश म्हस्के,
मनसे उप तालुकाध्यक्ष.या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु झाले पासून दोन तीन टू व्हीलर वाहन धारक दिशा दर्शक फलक नसल्याने पडले आहेत.
सिद्धार्थ सातपुते,
नागरिक.