पारनेर तालुक्यातील हजारो नागरीक विविध शासकीय योजना पासून वंचित.

वंचितांना न्याय देण्यासाठी सामजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार.
पारनेर दि.६ पारनेर प्रतिनिधी
ज्येष्ठ नागरीक, विधवा, परित्यक्ता, शेतकरी, लाडकी बहिण, रेशन कार्ड धारक, मतदान कार्ड, संजय गांधी निराधार योजना, नमो किसान, पी एम किसान, या सारख्या विविध शासकीय योजनाचा लाभ घेण्या पासून पारनेर तालुक्यातील हजारो नागरीक अजूनही वंचित आहेत.त्यांच्या अपूर्ण कागद पत्रांची पूर्तता करून घेण्यासाठी व सर्व सामान्य नागरिकाना एक सामाजिक आधार देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते,सेतू चालक यांनी पारनेर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे शिबिराचे आयोजन केले होते. या वेळी तालुक्यांतील हजारो शासकीय योजना पासून वंचित नागरिक उपास्थित होते.
सर्व सामान्य नागरिक यांना शासकीय योजनाचा लाभ घेण्या साठी अनेक कागद पत्रांची पूर्तता करावी लागते. स्थानिक पातळी वरील ग्रामसेवक, तलाठी, सरपंच नागरिकांना योग्य मार्गदर्शन करत नसल्याने नागरिक शासनाचे विविध योजना पासून वंचित राहत आहेत. या नागरिकांना शासकीय योजनाचा ऑनलाईन पद्धतीने लाभ मिळून देण्यासाठी पारनेर शहरातील सामजिक कार्यकर्ते भाऊसाहेब खेडेकर यांनी सामाजिक उपक्राअंतर्गत शहरातील बाजार तळ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुक्यांतील खेडे पाड्यातून हजारो नागरीक या शिबिराचा लाभ घेण्यासाठी उपास्थित होते. सामाजिक कार्यकर्ते भाउसाहेब खेडेकर यांनी उपास्थित नागरीकांच्या शासकीय योजनाचा ऑनलाईन पद्धतीने लाभ घेण्या साठी लागणाऱ्या कागद पत्रांची पूर्तता करण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले. उपास्थित नागरिकांची कागद पत्रांची पडताळणी करून शासकीय योजनाचा ऑनलाईन पद्धतीने लाभ मिळून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संयोजकांनी सांगीतले.
चौकट: पारनेर तालुक्यातील हजारो नागरीक शासकीय योजन चा ऑनलाईन पद्धतीने लाभ घेण्यासाठी अपूर्ण कागद पत्रां अभावी वंचित आहेत. आम्ही या नागरीकांच्या कागद पत्रांची पूर्तता करून या वंचित असलेल्या नागरिकांना शासकीय योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
भाऊसाहेब खेडेकर
सामजिक कार्यकर्ते.