आदर्श शिक्षक खैरनार यांच्या बदलीने भरवीर खुर्द गाव हळहळले!

नाशिक प्रतिनिधी
डॉ. शाम जाधव
ईगतपुरी भरवीर खुर्द आज दिनांक२०/१०/२०२४ रोजी येथील न्यू इंग्लिश स्कूल भरवीर खुर्द येथील आदर्श शिक्षक श्री अनिल खैरनार सर यांची बदली झाल्याने सर्व भरवीर गावातील ग्रामस्थ व विद्यार्थी नाराज झाले कारण ज्या वेळेस आपल्या भरवीर गावात आठवी ते दहावी शाळा सुरू झाली कारण भरवीर हे एक छोटेसे खेडेगाव आहे व त्या ठिकाणी शिक्षण संस्था लोकनेते गोपाळराव गुळवे प्रेरणे शाळा सुरू झाली त्यावेळेस गावातील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्ग उपलब्ध नव्हता व सरांनी शिक्षकांना कुठलाही पगार नव्हता त्यावेळेस सरांनी खूप हालाखीचे दिवस काढले व तेरा वर्षे बिना पगाराची ड्युटी आदर्श विद्यार्थी घडविले तसेच त्यांचे लग्न झाल्यानंतर त्यांच्या पत्नी सौ वनिता खैरनार या ज्यावेळेस भरवीर गावात आल्यानंतर सुशिक्षित असल्या तरी त्या लगेच छोट्याशा गावामध्ये मिळून मिसळून राहू लागले व खैरनार सरांना खूप मोठा आधार भेटला

व त्यांचा प्रवास चालू झाला गावातील सर्व लहान थोर मंडळी व माजी विद्यार्थी सर्वांशी मिळून मिसळून व वनिता मॅडम पण सर्वांना भाव दादा करून या भरवीर गावात वावरू लागल्या तसेच खैरनार सरांची बदलीची बातमी मिळतात एक प्रकारे गावाला धक्काच बसला गावातील लहान थोर मंडळी नाराज झाली व सर्व माजी विद्यार्थी व गावातील आजी-माजी कार्यकर्ते चक्रावून गेले कारण खैरनार सर हे एक आदर्श शिक्षक म्हणून ओळखले जायचे व लहानथोरमंडळीच्या चर्चेत राहायचे तसेच गावातील बरेच विद्यार्थी घडवले व त्यांना नोकऱ्या लागल्या सर्वांच्या डोळ्यात पाणी आले व सर्वांनी विचार करून त्यांचा सत्कार मारुती मंदिरात ठेवण्यात आला तसेच गावातील पोलीस पाटील रमेश टोचे माजी सरपंच रामभाऊ सारुकते शिवाजीराजे काजळे युवा सेना सुरज भाऊ कोकणे रामदास टोचे मुरलीधर बांडे तुळशीराम टोचे विकास कोकणे महाजन सर क्षीरसागर सर मयूर शिंदे अर्जुन टोचे दर्शन टोचे बंटी टोचे नितीन टोचे तुषार शिंदे दीपक शिंदे विशाल टोचे नवनाथ स्वरूप्ते गोरख पुंडे सचिन बांडे योगेश दौंडे, मनोहर टोचे, भाऊसाहेब सोनवणे भास्कर सारुकते, बंडू शिंदे