महिला समाज रत्न पुरस्कार सन्मान सोहळा संपन्न

नाशिक प्रतिनिधी
डॉ शाम जाधव
नाशिक आज दिनांक २०/२०/२०२४ रोजी समाजातील महिला दैनंदिन उदरनिर्वाह करत असताना आपण ज्या समाजात राहतो खारीचा वाटा का होईना त्या समाजाचे देणे लागतो याच विचाराने महाराष्ट्रातील ज्या महिलांनी सामाजिक कार्यात आपले योगदान दिले त्याची दखल घेऊन संजय देशमुख यांच्या संकल्पनेतून साई धनवर्षा फाउंडेशन नाशिक तर्फे सालाबाद प्रमाणे
महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांना समाजरत्न पुरस्कार सन्मान सोहळा रोटरी हॉल गंजमाळ नाशिक येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री रामराव मोतीराम शिंदे, ज्येष्ठ समाजसेवक, प्रोप्रायटर, विकास इंटरप्राईजेस नासिक, डॉ. आशा मदन पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष ~ ग्राहक रक्षक समिती, नाशिक, सौ सारिका संजय देशमुख, खजिनदार ~ साई धनवर्षा फाउंडेशन, नाशिक, सौ कावेरी गोविंद घुगे
मा नगरसेविका व सभापती बालकल्याण विभाग नाशिक डॉ सौ. ज्योती केदारे शिंदे
ग्रामपंचायत अधिकारी व मिसेस युनिव्हर्स विनर २०२४, श्री. राधाकृष्ण सखाराम नाईकवाडे, संचालक श्री समर्थ सहकारी बँक लि. नाशिक, श्री ज्ञानेश्वर आर वरपे, डायरेक्टर ~ ऑल महाराष्ट्र रोडलाईन्स, श्री महाराष्ट्र लॉजिस्टिक, श्री विश्वनाथ किसन किरकिरे, महासचिव महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस तसेच प्रमुख उपस्थिती राज योगिनी ब्रह्मकुमारी सरला दीदी, सौ माधुरी प्रभाकर कुळकर्णी, डॉ. चेतनाताई सेवक, सौ. शिल्पा संतोष झारेकर सौ. प्रणाली प्रभाकर जाधव, सौ. प्रतिभा विलास आहेर सौ मेघाताई शिंपी, सौ कल्पना जगताप, सौ शालिनी नलावडे, सौ ललिता ठाकरे, सौ सुनीता बाविस्कर, श्री. राहुल एस अनावले व फाउंडेशनचे पदाधिकारी श्री अंतोष निवृत्ती धात्रक, श्री बबलू पांडुरंग सूर्यवंशी, श्री हर्षल रवी चव्हाण, श्री भगवान शिवाजी घुगे, नितीन राजेंद्र अमृतकर, श्री केवळ सिताराम पाटील, श्री सचिन किसनराव जोशी, व मोठ्या संख्येने महाराष्ट्रातील नागपूर वर्धा धुळा जळगाव ठाणे मुंबई पुणे नंदुरबार अदी महाराष्ट्र व बाहेर गुजरात, मध्यप्रदेश राजस्थान राज्यातील महिला उपस्थित होते, यावेळी फाउंडेशन तर्फे दोनशे एक पुरस्कार निशुल्क देण्यात आले, यावेळी विविध सामाजिक संस्थेकडून फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय श्री. संजय देशमुख यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी प्रमुख पाहुण्यांनी व पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले ह्या सन्मान सोहळ्यात एकूण २०१ महिला यांना सन्मानित करण्यात आले
आभार प्रदर्शन बबलू सूर्यवंशी यांनी केले
कार्यक्रमाचे सूत्र संचालन अर्चना आहेर आणि अश्विनी पाटील यांनी केले
