विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजुर येथे पोलीस पथ संंचालन.

वीलास तुपे
. राजूर प्रतिनिधी
अकोले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून राजुर पोलीस स्टेशनच्या वतीने पथ संंचालन करण्यात आले. आज दुपारी शहराच्या एस टी स्टॅन्ड, वंजार गल्ली, बाजारपेठ, महादेव मंदिर, पिचड बंगला,असा विविध भागातून सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथसंचलन करण्यात आले. सध्या अकोले विधानसभा मतदारसंघाची निवडणूक रणधुमाळी सुरू आहे.

त्यामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्था सुरळीत राहावी, कुठेही अनुचित प्रकार घडू नये व व भयमुक्त निवडणूक पार पडावी यासाठी म्हणून पथ संंचालन करणेत आले
. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे,आयटीबीपीचे कमांडंर मनोजकुमर यांच्यासह 50जवान, सहायक पोलीस उपनिरीक्षक, विलास माळवदे सह सर्व अंमलदार व कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी विधानसभा निवडणूक बंदोबस्ताच्या अनुषंगाने योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन केले.
