इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि २८/१०/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- कार्तिक ०६ शके १९४६
दिनांक :- २८/१०/२०२४,
वार :- इंदुवासरे(सोमवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२८,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०५:५७,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- हेमंतऋतु
मास :- अश्विन
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- एकादशी समाप्ति ०७:५१,
नक्षत्र :- पूर्वा समाप्ति १५:२४,
योग :- ब्रह्मा समाप्ति ०६:४७,
करण :- कौलव समाप्ति २१:११,
चंद्र राशि :- सिंह,
रविराशि – नक्षत्र :- तुला – स्वाती,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- वृश्चिक,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी ०७:५५ ते ०९:२१ पर्यंत,

लाभदायक वेळा
अमृत मुहूर्त — सकाळी ०६:२८ ते ०७:५५ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ०९:२१ ते १०:४७ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०३:०५ ते ०४:३१ पर्यंत,
अमृत मुहूर्त — संध्या. ०४:३१ ते ०५:५७ पर्यंत,

❀ दिन विशेष:-
रमा एकादशी, वसुबारस, सायंकाळी सवंत्सर गाईचे पूजन करावे, दग्ध ०७:५१ प., व्दादशी श्राद्ध,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- कार्तिक ०६ शके १९४६
दिनांक = २८/१०/२०२४
वार = इंदुवासरे(सोमवार)

मेष
आजचा दिवस तुमच्यासाठी विचारशील असेल. कर्ज घेण्याचा विचार आत्ता करू नका. आज मित्रांची साथ मिळेल. पत्नीच्या बाजूने चांगली साथ मिळेल. आज नशीबाची चांगली साथ मिळेल.

वृषभ
आजचा दिवस व्यस्त असेल. महत्त्वाचा निर्णय आज घेऊ शकाल. प्रलंबित कामे आज पूर्ण होतील. आज समारंभासाठी आमंत्रण येईल. आज धावपळीमुळे थकवा जाणवेल.

मिथुन
अनावश्यक खर्च केला जाईल. सामाजिक कामात अडथळा येऊ शकतो. देवावरील विश्वास दृढ होईल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. मन प्रसन्न राहील.

कर्क
आजचा दिवस चांगला जाईल. मेहनतीचे गोड मिळेल. मुलांवरील विश्वास दृढ होईल. दिखाव्यासाठी पैसे खर्च कराल. मोठ्यांचा आशीर्वाद लाभेल.

सिंह
आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल. बोलण्यात गोडवा असावा. डोळ्यांशी निगडीत अडचण दूर होईल. इतरांशी असणारे संबंध जपावेत.

कन्या
आजचा दिवस सुखद असेल. हातातील कामे न डगमगता कराल. वडीलांचे सहकार्य लाभेल. जोडीदाराच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. लोक तुमच्याविषयी गैरसमज करून घेऊ शकतात.

तूळ
आजचा दिवस शुभ असेल. तुम्हाला मनाजोगी फळे मिळतील. नात्यात गोडवा निर्माण होईल. इतरांच्या आनंदाचा विचार कराल. सांपत्तिक स्थिती सुधारेल.

वृश्चिक
मन काही कारणाने व्याकूळ होऊ शकते. व्यावसायिक प्रश्न सोडवता येतील. हितशत्रूंवर जय मिळवाल. संयमाने सर्व गोष्टी साध्य करता येतील. अडकलेली कार्यालयीन कामे पूर्ण होतील.

धनू
दिवस चांगला जाईल. तुमच्या ज्ञानात भर पडेल. आवड जोपासता येईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. पोटाचे विकार जाणवतील. आहारवर संयम ठेवा.

मकर
मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. नावडते लोक सामोरे येतील. नातेवाईक तुमचा आदर करतील. सहकारी तुमच्या मताशी सहमत होतील. नवीन कामात गुंतवणूक कराल.

कुंभ
नशीबाची साथ मिळेल. केलेला खर्च फायदेशीर ठरेल. कोणावरही अति विश्वास ठेवू नका. नोकरांचे सुखं लाभेल. जवळचा प्रवास घडेल.

मीन
मुलांशी मतभेद संभवतात. आनंदी लोकांचा सहवास लाभेल. वाहवत जाऊ नका. सामाजिक सन्मानात वाढ होईल. तुमचे मनोबल वाढेल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button