हरिश्चंद्रगड परीसरात आदिवासी पाड्यावर आधारची दिवाळी!

अकोले प्रतिनिधी
आधार फाउंडेशनच्या वतीने हरिश्चंद्राच्या जवळ
व कुंजिर गडाच्या पायथ्यासी असणाऱ्या विहीर गावात
दोन पाड्यांवर आदीवासीच्या शेतात तुरेमाळ व कोरडेवस्तीत आदिवासी माता-भगीनी सोबत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांच्या जाउन त्यांना दिड किलो फराळ व छानशी साडी भेट देवून त्यांची खरी दिवाळी साजरी केली
एकीकडे सर्वजण दिपावलीच्या आनंदात असताना आदीवासी दुर्गम भागात भाताच्या कापणीची तयारी
सुरु असते, कारण निसर्गाच्या हवेवर अवलंबून असल्याने कधी वादळी पाऊस धोका देईल हे सांगता येत नाही. म्हणून भाताची कापनी करून ने सुरक्षित घरान आले म्हणने या बांधवांची दिवाळी

दिवशी आधारचे सिलेदार सकाळी साडे नऊ वाजता विहीर गावातील या पाड्यावर पोहचून शेतातच त्यांना दिवाळी भेट दिली. पंधरा वर्षापासून आधार संस्था दिवाळी भेट कार्यक्रम राबवते. या बरोबर निराधार विद्यार्थ्यांना मदत, आपत्तीग्रस्थ कुटुंबाला आधार असे उपक्रम राबवत आहे
महिलांनी पारंपारीक गीत गावून आपला आनंद साजरा केला
या प्रसंगी सुखदेव इदे डॉ. महादेव अरगडे, देवास गोरे,
दिपक-कर्पे, संतोष शेळके,, राजू रहांने, तान्हाजी आंधळे, दिपक बोऱ्हाडे ,भाऊसाहेब कासार, सखाराम तळपाडे, मानसी कासार, अश्विनी नाडेकर वेदांत कासार, असे आधारचे सिलेदार उपस्थित होते