इतर
प्रकाश सैंदाणे यांचा आदिवासी विकास संघाच्या वतीने सत्कार

शिर्डी प्रतिनिधी :
(संजय महाजन)
न्याहाळोद ता.जि.धुळे येथील रहिवासी प्रकाश जगन्नाथ सैंदाणे यांना संत सेना महाराज, नाभिक समाजाच्या वतीने २०२४ मुंबई यांच्या वतीने त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.
ते रिझवी कॉलेज बांद्रा येथे प्रयोगशाळा सहाय्यक या पदावर कार्यरत आहेत.प्रकाश सैंदाणे यांना सामाजिक कार्याची आवड आहे.प्रकाश हे नावाप्रमाणे तेजोमय व प्रकाशमान आहे.ते अत्यंत जिद्दी, महत्त्वकांक्षी, प्रामाणिक, दयाळू व निष्ठावंत आहेत.त्यांना पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मोतीलाल सोनवणे, छोटू काकुळदे इत्यादी पदाधिकाऱ्यांनी त्यांचा मुंबई येथे सत्कार केला.