अकोल्यात 1 लाख 92 हजार 556 मतदारांनी केले मतदान ! आता प्रतीक्षा निकालाची

लाडक्या बहिणींचा कौल कोणाला ?
सुनील गिते
अकोले दि 20
216 अकोले विधानसभा मतदार संघात एकूण 9 उमेदवार असले तरी महायुतीचे डॉ किरण लहामटे व महाविकास आघाडीचे उमेदवार जिल्हा बँकेचे संचालक अमित अशोकराव भांगरे ,अपक्ष उमेदवार वैभव मधुकरराव पिचड अशी चुरशीची तिरंगी लढत झाली
मतदार संघातील 307 मतदान केंद्रांवर आज शांततेत मतदान पार पडले विधानसभा मतदार संघात अमित अशोकराव भांगरे ,डॉ. किरण यमाजी लहामटे ,पथवे पांडुरंग नानासाहेब., भिवा रामा घाणे, किसन विष्णु पथवे,पिचड वैभव मधुकरराव,मधुकर शंकर तळपाडे., मारुती देवराम मेंगाळ ,विलास धोंडीबा घोडे असे एकूण नऊ उमेदवार रिंगणात होते
216 अकोले विधानसभा मतदारसंघात 1 लाख 2हजार 810 पुरुष तर 89 हजार 745 महिला मतदारांनी मतदान केले तर एका तृतीयपंथीयाने देखील आपला मतदानाचा हक्क बजावला आहे एकूण 2 लाख 67 हजार 510 मतदारांपैकी 71. 98% टक्के म्हणजे 1लाख 92 हजार 556 मतदार मतदारांनी मतदान केले
अखेरच्या टप्प्यापर्यंत वैभव पिचड , किरण लहामटे अमित भांगरे यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले. मारुती मेंगाळ आणि मधुकर तळपाडे यांनी देखील नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला परंतु विजयापर्यंत पोहोचण्याची शास्वती नसल्याने अखेरच्या टप्प्यात त्यांनी निवडणुकीतून अंग काढून घेतले मतदारसंघात त्यांना कुठेही बूथ नियोजन करता आले नाही मात्र वैभव पिचड, डॉ. किरण लहामटे आणि अमित भांगरे यांनी नियोजनपूर्वक प्रत्येक केंद्रावर बुथ नियोजन केले
मतदारसंघात मधुकर पिचड यांचे सुपुत्र माजी आमदार वैभव पिचड यांनी अपक्ष निवडणूक करत अपक्ष उमेदवारी करत महायुती चे किरण लहामटे व महाविकास आघाडीचे अमित भांगरे यांची धोबीपछाड केली महायुती चे किरण लहामटे महाविकास आघाडीचे अमित भांगरे तसेच अपक्ष उमेदवार वैभव पिचड यांच्यातच तिरंगी लढत होऊन त्यांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले
लाडकी बहीण योजनेमुळे यावेळी प्रथमच महिला मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदानाचा उत्साह दिसून आला या महिला मतदारांचा टक्का कोणाच्या बाजूने जातो याकडे आता लक्ष लागले आहे महिला मतदार कुणाला कौल देणार हे 23 तारखेला मतमोजणीच्या दिवशी दिसणार आहे

अकोले तालुका अकोले विधानसभा मतदारसंघात सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत 5.30% मतदान झाले नऊ नऊ ते अकरा यादरम्यान मतदानाचा वेग वाढला तो 19% पर्यंत गेला 19.80% झाला 80 टक्के मतदान झाले
अकोले विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 67 हजार 510 एकूण मतदार आहेत त्यापैकी 1 लाख 39 हजार 419 पुरुष मतदार आहेत तर एक लाख 28 हजार 090 महिला मतदार आहेत सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत 14,170 मतदारांनी मतदान केले तर

सकाळी 11 वाजेपर्यंत मतदानाची ही आकडेवारी 52 हजार 979 झाली 32412 पुरुष तर 20,567 महिला मतदारांनी मतदान केले त्याची टक्केवारी 19.80% झाली
दुपारी एक वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी 30.54% झाली 45 हजार 495 पुरुष मतदारांनी तर 39 हजार 115 महिला मतदार असे एकूण 84 हजार 610 मतदारांनी मतदान केले
दुपारी 3 वाजे पर्यंत 53.19 टक्के मतदान झाले तर सायंकाळी 5 वाजे पर्यंत 66.16 टक्के मतदान झाले तर सायंकाळी उशिरा पर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी
सरासरी 71.98 टक्के इतकी झाली। 23 तारखेला निकाल जाहीर होणार असून या दुपार पर्यंत सर्व निकाल हाती येईल तो पर्यंत आता निकाला ची प्रतीक्षा ताणली आहे
“””””””””””””””””””””””””””””””””””
अकोले विधानसभा निवडणुकीत बुथ निहाय
आकडेवारी येथे पहा—