इतर

रोटरी नाशिक एनक्लेव्हतर्फे “इन्ट्रॅक्ट विक”चे आयोजन

नाशिक दि १३ – रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३०च्या अंतर्गत नाशिक शहरातील कार्यरत रोटरी एनक्लेव्हमार्फत येत्या १५ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी दरम्यान शहरातील विविध रोटरीच्या क्लबतर्फे विविध शाळांमधील इन्ट्रॅक्ट क्लबच्या बालसभासदांसाठी इन्ट्रॅक्ट विकचे आयोजन करण्यात आले आहे.

इन्ट्रॅक्ट क्लब रोटरीमार्फत ज्या शाळांमध्ये इयत्ता १०वी पर्यंतचे विद्यार्थी स्वयंशिस्तीने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विषयांवर एकत्र येऊन विविध उपक्रम करतात आणि रोटरी क्लब त्यांना याकामी सहकार्य करून मुलांचा सर्वांगीण विकासासाठी शाळांना प्रोत्साहित करते .वीस मुलांचा हा समूह शाळेत मोठया आत्मविश्वासाने वेगवेगळे उपक्रम राबवित असतात .त्यामुळेच या विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती रोटरी एनक्लेव्हचे चेअरमन संजय कलंत्री यांनी दिली.

या कालावधीत विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच मैदानी देशी खेळांच्या स्पर्धांचे आयोजनही केले आहे.

स्पर्धा तपशील खालीलप्रमाणे –
दि.१५ फेब्रुवारी – फुलांची रांगोळी
दि.१६ फेब्रुवारी – खो-खो
दि.१७ फेब्रुवारी – चित्रकला
दि.१८ फेब्रुवारी – टाकाऊ पासून वस्तू बनविणे (विशेष विद्यार्थ्यांसाठी)
दि.१९ फेब्रुवारी – रोबोटिक्स कार्यशाळा
दि. २० फेब्रुवारी – ऑनलाईन वादविवाद
दि. २३ फेब्रुवारी – बक्षीस वितरण सोहळा आयोजित केला आहे. या उपक्रमात मूक बधीर आणि मतीमंद विद्यार्थ्यांनीदेखील सहभाग नोंदवला असून ते स्वनिर्मितीचा आनंद घेणार आहेत.

हा सप्ताह रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे नाशिक रोटरी एनक्लेव्ह चेअरमन संजय कलंत्री यांच्या संकल्पनेतून तसेच उपप्रांतपाल अनिल सुकेणकर व सौ. माधवी सुकेणकर, मुग्धा लेले, अदिती अग्रवाल, कीर्ती टाक, मनिषा विसपुते यांच्या सहकार्याने आयोजित केला जात आहे. हा उपक्रम शासकीय नियमांचे पालन करून घेण्यात येणार आहे. या उपक्रमास रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे विद्यमान प्रांतपाल रमेश मेहेर यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या. यासाठी नाशिक शहरातील कार्यरत सर्व रोटरी क्लबचे प्रेसिडेंट व सेक्रेटरी यांचे सहकार्य लाभत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button