आजचे पंचांग व राशिभविष्य दि.०२/१२/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अग्रहायण ११ शके १९४६
दिनांक :- ०२/१२/२०२४,
वार :- इंदुवासरे(सोमवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:४७,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०५:५०,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- हेमंतऋतु
मास :- मार्गशीर्ष
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- प्रतिपदा समाप्ति १२:४४,
नक्षत्र :- ज्येष्ठा समाप्ति १५:४६,
योग :- धृति समाप्ति १६:०१,
करण :- बालव समाप्ति २५:००,
चंद्र राशि :- वृश्चिक,(१५:४६नं. धनु),
रविराशि – नक्षत्र :- वृश्चिक – अनुराधा,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- धनु,(११:५७नं. मकर),
राशिप्रवेश :- शुक्र – मकर ११:५७,
शुभाशुभ दिवस:- दु. ०४नं. चांगला दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी ०८:१० ते ०९:३३ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
अमृत मुहूर्त — सकाळी ०६:४७ ते ०८:१० पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ०९:३३ ते १०:५६ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०३:०५ ते ०४:२८ पर्यंत,
अमृत मुहूर्त — संध्या. ०४:२८ ते ०५:५० पर्यंत,
❀ दिन विशेष:-
मार्तंड भैरव (मल्लारी खंडोबा), षड्रात्रोत्सवारंभ, देवदीपावली, चंद्रदर्शन (१८:५३ प.), मु. ३० साम्यार्घ, जेष्ठा रवि १९:०९, व्दितीया श्राद्ध, इष्टि,
————–
:
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अग्रहायण ११ शके १९४६
दिनांक = ०२/१२/२०२४
वार = इंदुवासरे(सोमवार)
मेष
अवांछित खर्च सामोरे येऊ शकतात. बहु राष्ट्रीय कंपनीत काम करणार्यांना दिवस चांगला जाईल. डोळ्यांची काळजी घ्यावी. मनात नसत्या शंका आणू नका. मनाच्या चंचलतेला आवर घालावी.
वृषभ
आज विविध स्तोत्रातून लाभ मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. भावंडांसोबत दिवस मजेत घालवाल. मित्रांमध्ये तुमची प्रशंसा केली जाईल. आवडीची खरेदी केली जाईल.
मिथुन
कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम पहायला मिळतील. दिवसभर कामाची धांदल राहील. एकाचवेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. आर्थिक गणित सोडवता येईल. वरिष्ठ नवीन जबाबदारी देऊ शकतात.
कर्क
धार्मिक बाबीत रस घ्याल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. मनातील समस्या दूर कराव्यात. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. धार्मिक स्थळाला भेट द्याल.
सिंह
जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. पोटाचे विकार संभवतात. मनातील भलत्या चिंता बाजूला साराव्यात. अचानक लाभाची शक्यता. त्रासदायक गोष्टींपासून लांब राहावे.
कन्या
जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. संध्याकाळी एखादे सरप्राइज मिळेल. भागीदारीत चांगला नफा मिळेल. जनसंपर्कात वाढ होईल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.
तूळ
इतरांच्या बोलण्याचा मनावर परिणाम होऊ शकतो. क्षुल्लक गोष्टी मनाला लावून घेऊ नका. उगाचच चिडचिड होऊ शकते. आत्मविश्वास सोडून चालणार नाही. बाहेरील अन्न पदार्थ खाणे टाळावे.
वृश्चिक
आजोळच्या नातेवाईकांची गाठ पडेल. विद्यार्थ्यांना चांगला दिवस. आपले छंद जोपासावेत. प्रेमातील लोकांना एकत्र वेळ घालवता येईल. जुगारातून लाभ संभवतो.
धनू
कौटुंबिक जीवनात चांगले बदल होतील. घरातील ज्येष्ठांची सेवा करता येईल. अधिक वेळ घरगुती कामात घालवाल. वाहन खरेदीची इच्छा पूर्ण करता येईल. जवळचा प्रवास सुखाचा होईल.
मकर
आपल्यातील सकारात्मक ऊर्जेचा वापर करावा. रखडलेली कामे तडीस नेता येतील. लहान भावंडांचा हातभार लागेल. प्रेक्षणीय स्थळाला भेट द्याल. अचानक जुने मित्र भेटतील.
कुंभ
सांपत्तिक स्थिती सुधारेल. इतरांना बोलण्यातून जिंकू शकाल. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल. व्यापारी वर्ग खुश असेल. लहान व्यवसायिकांना चांगला नफा मिळेल.
मीन
आज लोक तुमच्यावर व्यक्तिमत्वावर आकर्षित होतील. विश्वासू मित्रांची साथ घ्यावी. आजचा दिवस मनाप्रमाणे घालवाल. लोकांवर तुमची चांगली छाप पडेल. प्रेमळपणे सर्वांच्या मनात घर कराल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर