ग्रामीणमहाराष्ट्र

अकोले तालुक्यात पोल्ट्री व्यावसायिकांची पहिली बैठक संपन्न!

कोतुळ प्रतिनिधी

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात मुळा विभाग परिसरातील सर्व पोल्ट्री धारकांची पहिली बैठक कोतुळ येथे पार पडली

या बैठकीसाठी संगमनेर तालुक्यातील मच्छिंद्र भागावत, बाळासाहेब देशमुख, दिपक शेवंते, सुनिल चौधरी, सखाराम घोडे, भाऊसाहेब सावळे, संतोष सावळे, सागर चौधरी तसेच मुळा पट्यातील सर्व पोट्रीधारक उपस्थित होते.

यावेळी मुळा भागातील सर्व पोल्ट्रीधारक आणि शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

या बैठकीमध्ये पोट्रीधारकांना पोल्ट्री व्यवसायातील फायदे व तोटे सांगण्यात आले. व पोल्ट्रीधारकांना पोल्ट्रीमधील पक्ष्याची काळजी व निगा कशी राखायची यांची माहिती पुरेपूर देण्यात आली. लोकांना संघटित करून येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.

गेल्या अनेक वर्षेपासून वेगवेगळ्या प्रकारे नैसर्गिक आपत्ती, वादळ ,महापूर, बर्ड फ्लू त्याचबरोबर कोरोना महामारीमुळे पोट्री धारक शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेले आहे. मात्र पोट्री व्यवस्थापन करण्यासाठी होणारा खर्च वाढत चालला आहे. गरीब शेतकऱ्याकडून स्वताचे भांडवल नाही .म्हणून कंपनीवर अवलंबून राहावे लागत आहे.

त्यात कंपनी ट्रस्ट हाताचा वापर करून मेहनत करणाऱ्या शेतकऱ्याला कमी मोबदला देत असल्याचं चित्र आता उमटत आहे. मिळणाऱ्या मोबादल्यामधून शेतकऱ्याला विजेचे बिले, कामाचा खर्च, बँकेचे कर्ज, पोट्री व्यवस्थापनाचा खर्च कसा भागावा हा प्रश्न आता पोल्ट्री धारकांसाठी महत्वाचा आहे.

या साठी अकोले तालुक्यातील पोट्रीधारक शेतकरी एकवटला असून कंपन्यांनी चालविलेली लूट व फसवणूक आता यापुढे सहन केली जाणार नाही. असा आवाज पोल्ट्री व्यवसायिकांनी उठवला आहे.

पोल्ट्रीधारकांना एकत्रित येऊन संघटना स्थापन करणे ही काळाची गरज आहे. हे पोल्ट्रीधारकांना यावेळी पटवून दिले. कारण पोल्ट्री व्यवसायातील कंपन्यां ह्या पोल्ट्रीधारकांची मोट्या प्रमाणावर फसवणूक पिळवणूक करत आहेत. ही पिळवणूक थांबवण्यासाठी संघटना स्थापन करने ही काळाची गरज आहे. असाही यावेळी सांगण्यात आले.


2011साली लीपटिंग रेट होता 0.30पैसे 2022 साली रेट आहे 0.50पैसे म्हणजे 11 वर्षात फक्त 0.20पैसे वाढले वर्षाला जर 0.10पैसे तरी महागाईच्या हिशोबानी वाढायला पाहिजे होते म्हणजे आता 2022साली 1 रुपया 30 पैसे मिळायला पाहिजे होते 2011 साली खाद्याची किंमत होती 15 ते 17रुपये किलो,आता आहे 35 ते 42 रुपये किलो 10 वर्षात एवड्या किंमती वाढल्या पण त्या हिशोबानी कंपन्यांचे Gc नाही वाढला 2011 साली बहुतेक कंपन्यांचे Gcहा 4किवा 5 रुपये किलो होता आता 2022 साली तेवढाच आहे म्हणजेच सर्व कंपन्या आपल्या शेतकऱ्यांची किती पिळवणूक करीत आहे आजून पिळवणूकीचे अनेक मुद्दे आहेत हि आपली पिळवणूक अन्याय थांबवण्यासाठी साठी आपण सर्वजण पोल्ट्री शेतकरी योद्धा एकत्र येणे खुपच गरजेचे असल्याचे मत यावेळी पोल्ट्री व्यावसायिकांनी व्यक्त केले

या बैठकीसाठी संगमनेर तालुक्यातील मच्छिंद्र भागावत, बाळासाहेब देशमुख, दिपक शेवंते, सुनिल चौधरी, सखाराम घोडे, भाऊसाहेब सावळे, संतोष सावळे, सागर चौधरी तसेच मुळा पट्यातील सर्व पोट्रीधारक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button