सामोडे येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह
: (संजय महाजन)
सामोडे येथे सालाबादाप्रमाणे श्री गुरुदत्ताच्या कृपाछत्राखाली व बै. ह.भ.प. गुरुवर्य लक्ष्मण तात्या महाराज (वळवाडे) व बै. ह.भ.प.प.पु. माऊली कृष्णाजी गुरुजी श्री क्षेत्र जायखेडकर व साधूसंतांच्या कृपाशिर्वादाने श्री दत्तनगर, श्री राम मंदिर, विठ्ठलनगर, राम नगर, इंदिरा नगर, शिंदे नगर भजनी मंडळ, शिवनेरी मित्र मंडळ, सामोडे व समस्त ग्रामस्थ, सामोडे ता. साक्री यांच्या सहकार्याने श्री गुरुदत्त जन्मोत्सव निमित्ताने श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम किर्तन सोहळा संपन्न होत आहे.
त्यानिमित्त प्रिय सज्जनहो, अध्यात्म्याच्या साधनेद्वारा मानवाच्या अशांत मनाला स्थायीभाव, सहिष्णुता व सुभाव, बंधुभाव, धर्मनिष्ठता, व्यसन, फॅशन या अधोगतीच्या मार्गाने जाणाऱ्या युवा वर्गाला सुसंस्कृतपणा निर्माण व्हावा या सद्हेतुने प्रेरीत होऊन वै. गुरुवर्य कृष्णाजी माऊली संतांच्या आशिर्वादाने तसेच ग्रामस्थांच्या बहुमोल सहकार्याने हरिपाठ, प्रवचन, किर्तन होणार आहेत. तरी भाविकांनी ज्ञान प्रबोधनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती. श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह वर्ष ३९ वे संपन्न होत आहे. तरी या ज्ञान अमृताचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती.
पुढील प्रमाणे कीर्तनकार रविवार ह.भ.प. अनंतदासजी महाराज, कजवाडे, सोमवार ह.भ.प. विजयजी महाराज काळे, पिंपळनेर, मंगळवार ह.भ.प. ओंकारजी महाराज, आळंदी, बुधवार ह.भ.प. दुर्गेशजी महाराज, गुरुवार बेंद्रीपाडा ह.भ.प. पंकजजी महाराज, पाठशाळा, धुळे, शुक्रवार ह.भ.प. वामनजी महाराज, आळंदी, शनिवार ह.भ.प. वामनजी महाराज, आळंदी, शनिवार ह.भ.प. ज्ञानेश्वरजी महाराज गवळी, रविवार ह.भ.प. ज्ञानेश्वरजी महाराज गवळी, वरील कीर्तनकार आहेत.
प्रारंभ – मार्गशिर्ष शु।। ७ शके १९४६ रविवार दि. ८/१२/२०२४,
सांगता – मार्गशिर्ष शु।। १५ शके १९४६ रविवार दि. १५/१२/२०२४,
स्थळ – ग्रामपंचायत पटांगण, सामोडे ता. साक्री जि. धुळे येथे आहे.
दैनिक कार्यक्रम – पहाटे ५ ते ७ काकडा आरती भजन, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, सकाळी ७ ते ११ व दुपारी ३ ते ५ ज्ञानेश्वरी पारायण, रात्री ९ ते ११ – जाहिर हरिकीर्तन होईल.
आयोजक – समस्त ग्रामस्थ व शिवनेरी मित्र मंडळ, सामोडे तरी सर्वांनी यावे.