‘मारकड वाडी ‘चे माकडचाळे थांबवा
एक अतिशयोक्ती अलंकार असे सांगतो आधीच मर्कट त्यात त्याने दारू पिली , त्यात त्याला विंचू डसला आणि त्यातच त्याला भुताने पछाडले! असे घडले तर काय होईल ? याचे उत्तर म्हणजे निवडणूक निकाल लागल्या नंतर जो तमाशा सर्व विरोधी पक्षाने सुरू केला आहे त्यामध्ये सापडते आहे.
लोकसभा निवडणूक झाल्यावर हवेत गेलेल्या मविआ
चे विमान जागृत जनतेने विधानसभा निवडणुकीत जमिनीवर आणले. ह्या निकालाचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करून योग्य तो धोरणात्मक बदल करणे हे वास्तविक जबाबदार राजकीय पक्ष म्हणून माविआतील तीन पक्षांच्या कडून अपेक्षित होते. पण ज्या पद्धतीने त्यांनी तमाशा सुरू केला आहे त्यावरून ते बेजबाबदार तर आहेतच पण त्यांचे नेते हे मस्तवाल आहेत हे त्यांनी सिद्ध केले आहे.
त्यामुळे ह्या सगळ्यांची अवस्था दारू पिलेल्या, विंचू डसलेल्या , भुताने पछाडलेल्या माकडा सारखी झाले आहे. प्रथम उपोषण आणि आत्मक्लेश नावाच्या नाटकाचा एक अंक झाला.त्याला कुणीही प्रतिसाद वगैरे दिला नाही. मग नानाच्या ताना झाल्या .७६ लाख मतदान वाढले कसे ? हा त्यांचा प्रश्न होता. त्यावर सरासरी मतदानास लागणारा वेळ आणि उपलब्ध असणारा वेळ हे गणित ऐकल्यावर नाना यांचा युक्तिवाद गळून पडला आणि ह्या विषयावर ते गप्प झाले.
मग ह्यांनी मारकडवाडी गावात बॅलेट पेपर वर मतदान घेण्याची टूम काढली आणि आता तर राजकीय पर्यटन करण्यासाठीची ही वाडी नवे केंद्र बनले आहे. जाणते राजे जाणार आहेत पाठोपाठ राहुल बाबा तेथे भेट देणार आहेत.अर्थात त्यांचे तेथे स्वागत देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदन करणाऱ्या पोस्टर्स ने होणार आहे त्यांनी आणखी त्यांची चीड चीड होणार आहे . असे पर्यटन केंद्र तयार करणे हा ह्या मंडळींचा जुना खेळ आहे.( १९७७ मधील पराभवानंतर इंदिराजी बेलछी येथे हत्तीवरून गेल्या होत्या.) हाथरस , संबल आणि अनेक अशी पर्यटन केंद्रे उभे करून जनतेला वेठीस धरणे हा ह्यांचा नेहमीचा उद्योग आहे.
विधानसभेत पेंग्विन छाप राजकुमारने आज शपथ घेणार नाही अशी आपल्या कोमल आवाजात डरकाळी (?) फोडली .पण जर शपथ घेतली नाही तर आमदार म्हणून संवैधानिक दर्जा मिळणार नाही ही साधी गोष्ट पण त्याला समजली नाही मग ,हे लक्षात आल्यावर उद्या निमूटपणे शपथ घेणार असे आता ठरवले आहे असे कळले.
तिकडे बिस्कीट पत्रकारांचे लाडके चाणक्य ज्ञान पाजळत होते आपल्या चाटू पत्रकारांच्या समोर ! ते , किती मते मिळाली आणि किती उमेदवार निवडून आले ह्याचे गणित मांडून. हे बोलणे इतके हास्यास्पद आणि बिनडोक पणाचे होते की मिळालेली मते किती जागा लढवून मिळाले ह्याची तुलना केलीच नाही . बरं हे सांगताना लोकसभेची आकडेवारी मात्र लपवून ठेवली. जे नंतर देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करून सांगितले, ते एका ही पत्रकाराने ह्या तथाकथित चाणक्यला विचारले नाही.
ह्या उलट ह्या मंडळींना कव्हरिंग फायर देण्यासाठी नेमाड पंथीय विषारवंत आणि विखारवंत टोळी सक्रिय झाली आहे. हाच तो नेमाडे ज्याने औरंग्याचे उदात्तीकरण त्याच्या बारामतीकर आश्रयदात्या समोर केले होते. आता तो लोकांना प्रती सरकार स्थापन करण्याची निर्लज्ज चिथावणी देतो आहे आणि ज्यांना कुणी कुत्रे विचारणार नाही त्याला मराठी माध्यमे विनाकारण प्रसिध्दी देत आहेत.
अजून एक हास्यास्पद मांडणी ह्या सगळ्यांची ! कुठे ही निवडणूक निकालानंतर म्हणे जनतेने जल्लोष केला नाही. समाज आणि लोकमानस यांच्याशी नाते तुटले की असले भंपक बोलणे सुरू होते. ह्या निकाल लागल्या नंतर लोकांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या , मिरवणुका काढल्या पण ह्या दारुड्या मर्कट मंडळींना हे काहीच दिसत नाही. स्वमग्नतेची दारू पिलेले हे मर्कट त्यांना , समाजाच्या असंतोषाची नांगी अशी डसली ,EVM नावाच्या भुताने जे पछाडले आहे. त्यातून ह्या मर्कट लीला चालू आहेत.
वास्तविक जुन्या काळात बॅलेट पेपर पद्धत वापरून कसे भ्रष्ट मार्गाने वापर करून निवडणुका जिंकल्या जात होत्या हे जगजाहीर आहे. ( त्यामुळेच इंदिरा गांधी यांचा विजय न्यायालयाने रद्द केला होता ) आणि असे गैरवापर जेंव्हा थांबले तेंव्हा खरे निकाल लागायला लागले.
वास्तविक सर्व सामान्य माणसाच्या मनातील धर्म , देव , परंपरा , संस्कृती याना लाथाडण्याचे जे पाप ह्या सगळ्या मंडळीनी केले .देवाचे बाप बनले. स्वामी समर्थांच्या सारख्या दैवताची अश्लाघ्य टिंगल केली. प्रभू रामचंद्र ह्यांची चेष्टा केली .त्यामुळे संतप्त झालेल्या समाजाने ह्यांना त्यांची जागा दाखवली .ह्या चुकांच्या बद्दल आत्मपरीक्षण करून समाजाला शरण जाणे सोडून ज्या मर्कटलीला चालू आहेत त्यावरून पराभवाचा मानसिक धक्का खूप तीव्र आहे असे दिसते.
हिंदू समाज मोठ्या संख्येने मतदानास बाहेर पडणे आणि मतदानाची टक्केवारी ६५/७० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त होणे हे ह्या निकालाचे महत्वाचे कारण आहे. व्होट
जिहादचा पूर्ण पराभव ह्या वाढलेल्या मतदानाने केला आणि तेथे मविआचा पराभव निश्चित झाला. हिंदुत्व आणि हिंदूहित आणि शून्य मुस्लिम लांगुन चालन हाच पुढे निवडणुकीत विजयाचा मार्ग असणार आहे . हे सत्य स्वीकारणे जड जात असल्यामुळे ह्या मर्कटलीला चालू आहेत. ( मायावती ह्यांनी हे सत्य स्वीकारले आणि आज बांगला मधील हिंदू अत्याचारावर आवाज उठवताना संबल बद्दल जी भूमिका घेतली ती स्वागतार्ह आहे.)
जर ह्या धक्क्यातून ही मंडळी लवकर बाहेर आले नाही तर आहे ते आमदार , खासदार सुद्धा बरोबर राहणार नाहीत अशी परिस्थिती आहे. तिकडे इंडी आघाडी चे नेतृत्व करण्यावरून ममता विरुद्ध राहुल विरुद्ध अखिलेश लढाई सुरू झाली आहेच.
जाणीवपूर्वक, निवडणुकीत झालेला लाजिरवाणा पराभव लपविण्यासाठी , त्याचे खापर कुणावर तरी फोडण्यासाठी , नियोजन पूर्वक EVM लक्ष करण्याचे ह्या मर्कट गँग ने ठरवले आहे. त्यांचे जॉर्ज सॉरास दुत आणि भारतातील प्रतिनिधी योगेंद्र यादव आणि त्याचा महाराष्ट्रीय अवतार विश्वंभर ह्यांनी जनमानसाने निवडून दिलेले सरकार आंदोलन करून उलथवून लावण्याच्या प्रयत्नांचा बांगला प्रयोगातील अंक महाराष्ट्रात EVM आंदोलन रूपाने चालू आहे आणि दिल्लीत किसान आंदोलन रूपाने चालू आहे.
त्यामुळेच देशासमोर लोकशाहीच्या दृष्टीने एक संकट उभे राहते आहे . अत्यंत दुबळा आणि वैचारिक दिवाळखोर असलेला त्याच बरोबर परकीय शक्तींच्या तालावर चालणारा विरोधी पक्ष ही बाब देशाला परवडणारी नाही. यांच्या मर्कट लीला लवकर थांबाव्या आणि ते भानावर यावे ही ईश्वर चरणी प्रार्थना !
रवींद्र मुळे,
अहिल्यानगर ,भ्रमणध्वनी : ९४२२२२१५७०