भेंडा येथे कुक्कुटपालन शिबिराचे आयोजन..

माका प्रतिनिधी
भेंडा ( ता.नेवासा ) येथील श्री.मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्था संचलित जिजामाता पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका विद्यालय,ज्ञानेश्वरनगर, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी व महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ,नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे भेंडा बु. येथे दिनांक १६ डिसेंबर २०२४ रोजी कुक्कुटपालन शिबिराचे आयोजन करण्यात आले
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर स्थापना दिनानिमित्त डॉ.पंडित नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.कैलास चिंधे यांच्या कुक्कुट उद्योग समूहास युवा शेतकरी व विद्यार्थ्यांना कुक्कुटपालन शिबिरामध्ये मार्गदर्शन करताना डॉ.शरद शिंदे यांनी कुक्कुटपालन व्यवस्थापन, लसीकरण, खाद्य नियोजन,हताळणी व विक्री तसेच मानवी शरीरासाठी अंडी हे प्रथिनांचा चांगला स्रोत असून त्यामुळे शारीरिक वाढ, रोग प्रतिकार शक्ती, जीवनसत्वे,खनिजे यांचा भरपूर पुरवठा होतो असे सांगत
शेतकरी व विद्यार्थी यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास परिसरातील शेतकरी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य श्री.सोपान मते यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.