भाऊसाहेब आहेर यांना साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर !

शिक्षण क्षेत्रात मुंबईस्थित कार्यरत असणाऱ्या पारनेरच्या भुमीपुत्राची गरुडझेप !
दत्ता ठुबे
पारनेर – सामाजिक , राजकीय , धार्मिक , शैक्षणिक क्षेत्रासह विविध क्षेत्रात पारनेर तालुक्याचे नाव देशभर पोचविणारे अनेक ज्ञानवंत ,गुणवंतांची खान म्हणून पारनेर तालुका ओळखला जातो.त्यापैकीच एक असणारे पारनेर तालुक्यातील पळसपूर येथील भूमिपुत्र असणारे व शिक्षण क्षेत्रात मुंबई स्थित कार्यरत असणारे भाऊसाहेब आहेर सर यांचे नाव घेता येईल.
मुंबई महापालिका माध्यमिक शिक्षक संघ आणि सहकार मित्र सुरेश डावरे सहकारी पतसंस्थेच्या वतीने सालाबाद प्रमाणे दिला जाणारा मानाचा साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार यावर्षी सेकंडरी स्कुल्स एम्प्लॉईस क्रेडिट सोसायटीचे संचालक व माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष भाऊसाहेब आहेर सर यांना जाहीर झाला असून २०२४ या वर्षाच्या अखेरीस म्हणजे बुधवार दि.२५ डिसेंबरला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते घाटकोपर येथील पाटीदार हॉल सभागृहात सुपूर्द केला जाणार आहे.
आहेर हे गेली ३० वर्षे शैक्षणिक व सहकार क्षेत्रात काम करीत असून त्यांच्या कामाची दखल घेत संस्थेने साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केला आहे.पुरस्कार जाहीर झाल्यानंतर नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके,अनेक मित्र परिवार,शैक्षणिक क्षेत्रासह सर्वच क्षेत्रातील हितचिंतक व मान्यवरांनी भाऊसाहेब आहेर सर यांचे अभिनंदन केले आहे.