इतर

अंनिसचे राज्य अधिवेशनात अरविंद गाडेकर यांचे व्यंगचित्रांचे प्रदर्शन


संगमनेर – आळंदी येथे अंनिसचे ३५ वर्षपूर्ती निमित्त एक दिवस संविधान जागर राष्ट्रीय परिषद आणि दोन दिवसीय राज्य अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात देशातील नामांकित आणि तज्ज्ञ वक्त्यांचे मार्गदर्शन मिळणार असल्याने महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यातून अंनिसचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत. या अधिवेशनाच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला संगमनेरचे व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांचे व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

या प्रदर्शनास प्रसिद्ध लेखक आणि ज्येष्ठ संपादक मा.संजय आवटे यांनी भेट दिली. अरविंद गाडेकर यांनी काढलेल्या प्रबोधनपर व्यंगचित्रांचे कौतुक केले. अरविंद गाडेकर यांचे या अगोदरही महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी व्यंगचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. तसेच त्यांनी १२२०० व्यंगचित्र साकारले याबद्दल त्यांना ग्लोबल बुक ऑफ एक्ससेलन्स अवॉर्ड इंग्लंड हा आंतरराष्ट्रीय अवॉर्ड मुंबई येथे प्रदान करण्यात आला आहे.
तसेच अंनिसचे राज्य अध्यक्ष अविनाश पाटील आणि कार्याध्यक्ष माधव बावगे यांनी प्रदर्शनास भेट देऊन व्यंगचित्राबद्दल समाधान व्यक्त केले. या व्यंगचित्र प्रदर्शनास महाराष्ट्रभरातून आलेल्या अंनिसच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
यावेळी संजय आवटे म्हणाले, लेखक, कलाकार आणि लोकशाहीतील सर्व घटकांनी जागरूक होऊन एकत्र येऊन आजच्या राजकीय आणि महाराष्ट्रातील बदलत्या समीकरणांवर बोलले पाहिजे, लिहिले पाहिजे. तुम्ही व्यंगचित्रातून बोलत आहात. आताची परिस्थिती पाहता आपण काहीच व्यक्त झालो नाही तर ती आपली चूक ठरेल. मग ते माध्यम कोणतेही असो. आपण व्यक्त होण्याची वेळ आली आहे. असे केल्यास आपण भारतीय म्हणून आपले कर्तव्य बजावले सारखे होईल


या अधिवेशनात प्रामुख्याने संजय आवटे, प्रा. नितीन नवसागरे, तिस्ता सेटलवाड , प्रा. खलील अन्सारी , ॲड. विंदा महाजन, सुभाष वारे , संजय बनसोडे , डॉ. प्रदीप जोशी, डॉ. अनिल डोंगरे , डॉ. प्रदीप पाटकर , प्रा. मच्छिन्द्र मुंडे, डॉ. नितीन शिंदे, उत्तम जोगदंड आणि अनेक वक्ते यांनी परिसंवादात भाग घेऊन मार्गदर्शन केले आहे. जेष्ठ लेखक व संपादक उत्तम कांबळे यांच्या उपस्थितीत या अधिवेशनाचा समारोप झाला.
या अधिवेशनास अंनिसच्या राज्य सहकार्यवाह ॲड. रंजना अंनिसच्या संगमनेर शाखेचे मा. प्राचार्य अशोक गवांदे , कार्याध्यक्ष काशिनाथ गुंजाळ, खजिनदार सोमनाथ जोर्वेकर , प्रशांत पानसरे , प्रा. सुवर्ण बेनके, विकास साबळे , अरविंद गाडेकर हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button