राज्यातील वीज कंत्राटी कामगारांच्या शासकीय संविधानिक देय रकमेचा अपहार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

पुणे प्रतिनिधी
महावितरण कंपनीत विविध नियमित मंजूर रिक्त पदावर सुमारे 24000 वीज कंत्राटी कामगार कार्यरत आहेत या कामगारांना शासनाकडून किमान वेतन जाहिर केले जाते व या अनुसार कामगारांचा ई.एस.आय.सी ( ESIC ) व भविष्य निर्वाह निधी ( PF ) भरण्यासाठी एक विशिष्ट रक्कम दिली जाते तीला शासकीय संविधानिक देय रक्कम असे म्हटले जाते .
मात्र मागील अनेक जिल्ह्यात महावितरण कंपनीत या शासकीय संविधानिक देय रक्कमेचा काही प्रशासकीय अधिकारी व कंत्राटदार यांनी संगनमताने अपहार केल्याचे संघटनेच्या निदर्शनास आले असून काही जिल्ह्यात संघटने कारवाई चालू केली असून आता प्रशासनाने सर्व जिल्ह्यात याची स्वतः सुमोटो कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे महामंत्री सचिन मेंगाळे यांनी केली आहे.
अनेक जिल्ह्यात पूर्ण किमान वेतन दिले जात नसून बोगस कामगार, अनेक पत संस्थेत बोगस खाती काढून अब्जावधी रुपयांची लूट चालवली आहे. हे रोखण्यासाठी राष्ट्रीयकृत बँक ऑफ इंडिया सोबत संघटनेने चर्चा केली असून याचा लाभ तिन्ही वीज कंपनीतील 42,000 कंत्राटी कामगारांना होणार असून या योजनेत सर्वांना 50 लाखाचा अपघात विमा मिळेल. लवकरच ही खाती उघडण्याचा उद्घाटन समारंभ होणार असल्याचे प्रदेश अध्यक्ष निलेश खरात यांनी सांगितले