व्ही.पी.एस मध्ये ‘वीर बाल दिन’ साजरा

विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ‘वीर बाल दिन’ साजरा करण्यात आला.
शिखांचे दहावे गुरु गोविंद सिंह यांच्या अजत सिंह, जुझावर सिंह, जोरावर सिंह आणि फतेह सिंह मुलांपैकी जोरावर सिंह आणि फतेह सिंह यांना बालवयात वीर गती मिळाली. म्हणून देशभरामध्ये 26 डिसेंबर ‘वीर बाल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
‘वीर बाल दिना’ निमित्त देशभरातील शाळा, कॉलेज, विविध शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संस्था यांच्यामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
‘वीर बाल दिना’निमित्त प्रशालेत 16 डिसेंबर ते 24 डिसेंबर दरम्यान सांस्कृतिक विभागातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्ताने निबंध लेखन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
प्रशाळेमध्ये 26 डिसेंबर ‘वीर बाल दिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री. भगवानभाऊ आंबेकर लाभले. कार्यक्रमासाठी प्राचार्य श्री. उदय महिंद्रकर, उपमुख्याध्यापक श्री. सुहास विसाळ, पर्यवेक्षक श्री. विजय रसाळ श्री. श्रीनिवास गजेंद्रगडकर, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती ज्योती डामसे आणि शिक्षकेतर प्रतिनिधी श्रीमती संजीवनी आंबेकर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समिती प्रमुख श्री. धनंजय काळे आणि श्री. योगेश कोठावदे तर सूत्रसंचालन श्री. सोमनाथ ढुमणे यांनी केले. प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक श्री. अनिल खामकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानिमित्ताने शाळेतील विविध खेळांमधून प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. पर्यवेक्षक श्री. गजेंद्रगडकर यांनी आभार मानले.
प्रशाळेचे जेष्ठ कलाशिक्षक श्री. महेश चोणगे यांनी सुंदर फलक लेखन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेतील शिक्षक, सेवक यांनी मोलाचे सहकार्य केले.